शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी रुग्णालयांतील नेत्र शस्त्रक्रियेत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 12:48 IST

Eye surgery in government hospitals २०१९ मध्ये १,३०० तर २०२० मध्ये केवळ ११० नेत्रशस्त्रक्रिया झाल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाकाळात खबरदारीचा उपाय म्हणून सरकारी रुग्णालयांतील नेत्र शस्त्रक्रिया विभाग प्रभावित झाल्याने, नेत्रशस्त्रक्रियेत कमालीची घट आली आहे. २०१९ मध्ये १,३०० तर २०२० मध्ये केवळ ११० नेत्रशस्त्रक्रिया झाल्या.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत कोरोनाबाधित रुग्ण आणि संदिग्ध रुग्णांच्या उपचारार्थ तैनात असल्याने, कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांवरील उपचार आणि शस्त्रक्रिया प्रभावित झाल्या होत्या. या दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयांतील नेत्र शस्त्रक्रिया विभागही जवळपास बंदच होते. नेत्र शस्त्रक्रियांचे रुग्ण शक्यतोवर वयस्क, मधुमेह, उच्च रक्तदाब आदी गटांतील असल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या होत्या. नोव्हेंबर महिन्यापासून सरकारी रुग्णालयांतील सर्व शस्त्रक्रिया विभाग पूर्ववत झाले असून, नेत्रशस्त्रक्रियाही सुरू झाल्या. वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जानेवारी महिन्यापासून नेत्रांशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांची रांग लागत असल्याचे दिसून येते. २०२० मध्ये एप्रिल ते ऑक्टोबर या दरम्यान नेत्रशस्त्रक्रिया ठप्प असल्याने नेत्रशस्त्रक्रियांत मोठी घट आल्याचे दिसून येते. २०१९ मध्ये सरकारी रुग्णालयात १,३०० नेत्र शस्त्रक्रिया झाल्या होत्या, तर २०२० मध्ये केवळ ११० शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

या कारणांमुळे ठप्प होत्या शस्त्रक्रियाकोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन काळात आरोग्य विभागानेही अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता इतर शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या होत्या. त्याचा फटका जिल्ह्यातील नेत्र रुग्णांनाही बसल्याचे दिसून येते. नेत्र शस्त्रक्रियेचे रुग्ण शक्यतोवर वयस्क, अतिजोखमीच्या गटातील असल्याने आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात कोरोनाबाधित, तसेच संदिग्ध रुग्णांवर उपचार सुरू असल्याने, कोणताही धोका नको, म्हणून कोरोनाकाळात नेत्रशस्त्रक्रिया विभाग जवळपास बंदच होता.

कोरोनाकाळात कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात आरोग्य यंत्रणा व्यस्त होती. कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने नेत्रशस्त्रक्रिया विभाग पूर्ववत झाला आहे. नेत्राशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांनी सरकारी दवाखान्यातील नेत्र विभागाशी संपर्क साधावा.- डॉ. मधुकर राठोड,जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम 

टॅग्स :washimवाशिमhospitalहॉस्पिटल