शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या काळात खासगीसह सरकारी दवाखान्यांतील बाह्यरुग्ण तपासणीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 12:33 IST

कोरोनाची भीती असल्याने याचा थेट परिणाम जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी दवाखान्यांमधील बाह्य रुग्ण विभागावर झाला

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च ते मे या तीन महिन्यात लॉकडाऊन तसेच संचारबंदी असल्याने तसेच कोरोनाची भीती असल्याने याचा थेट परिणाम जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी दवाखान्यांमधील बाह्य रुग्ण विभागावर झाला. या दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच खासगी दवाखान्याची ‘ओपीडी’ ५० टक्क्यांवर आली.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चपासून लॉकडाऊन व संचारबंदी लागू झाली. त्यानंतर जवळपास आठवडाभर जिल्ह्यातील बहुतांश खासगी दवाखाने बंद ठेवण्यात आले. जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी विविध डॉक्टर संघटनांशी चर्चा केल्यानंतर खासगी दवाखाने सुरू झाले. दुसरीकडे कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीपोटी रुग्णांनीदेखील अत्यावश्यक असेल तरच दवाखान्यात जाणे पसंत केले. त्यामुळे एप्रिल महिन्यात खासगी दवाखान्यातील ओपीडीमध्ये जवळपास ७० टक्के घट होती. दुसरीकडे जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयातही अत्यावश्यक असेल तरच रुग्ण जात असल्याने या रुग्णालयातील ओपीडी ५० टक्क्यांवर आली होती. मे महिन्यात खासगी दवाखाने पूर्णवेळ उघडल्यानंतर ओपीडीत वाढ झाली. जूनपासून ओपीडी पूर्ववत होत असल्याचे खासगी डॉक्टरांनी सांगितल. दुसरीकडे जून महिन्यात सरकारी रुग्णालयांतील ओपीडीतही वाढ होत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

सकाळच्या वेळी गर्दीसाधारणत: जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात दररोज एक हजाराच्या आसपास रुग्ण तपासणीसाठी यायचे; परंतु मध्यंतरी कोरोनामुळे लोक रुग्णालयामध्ये येण्यास घाबरत होते. लॉकडाऊनच्या कालावधीत ६०० वर ओपीडी आली होती. साधारणत: सकाळी ९ ते दुपारी १२ वाजतापर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी रुग्णांची गर्दी होत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिमhospitalहॉस्पिटल