शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिलाची रक्कम थेट शाळांना देण्याचा निर्णय हवेतच विरला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 16:34 IST

वाशिम : शाळांकडून होणाऱ्या वीज वापरापोटी माहेवारी येणाऱ्या वीज देयकांची रक्कम थेट शाळांनाच देण्याचा निर्णय मध्यंतरी शासनाने घेतला होता. प्रत्यक्षात मात्र हा निर्णय हवेतच विरला असून अनेक शाळा आर्थिक टंचाईमुळे वीज देयक भरू शकत नसल्याने विविध समस्या उद्भवल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शाळांकडून होणाऱ्या वीज वापरापोटी माहेवारी येणाऱ्या वीज देयकांची रक्कम थेट शाळांनाच देण्याचा निर्णय मध्यंतरी शासनाने घेतला होता. प्रत्यक्षात मात्र हा निर्णय हवेतच विरला असून अनेक शाळा आर्थिक टंचाईमुळे वीज देयक भरू शकत नसल्याने विविध समस्या उद्भवल्या आहेत. विशेषत: विजेअभावी डिजीटल शाळांचा उद्देश बहुतांशी असफल होत असल्याचे दिसून येत आहे. शालेय शिक्षण विभागाला मिळणारा अर्थसंकल्पीय निधी डिजिटल शाळा, शैक्षणिक साहित्य, गुणवत्ता आणि संगणकीकरणावर सर्वाधिक खर्च केला जात असल्याचे शासनाकडून वेळोवेळी सांगितले जात आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारतीची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ग्रामविकास विभागाची असली तरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्रामविकास आणि शालेय शिक्षण विभाग संयुक्तरित्या राज्यातील शाळांचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ करणार असल्याचेही दस्तुरखुद्द शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी बोलून दाखविले होते. मात्र, शाळांच्या ‘स्ट्रक्चरल आॅडिट’चा मुद्दा रखडण्यासोबतच शाळांना माहेवारी येणारी वीज देयकांची रक्कम मिळणे दुरापास्त झाल्याने बहुतांश शाळांमधील डिजीटल वर्गखोल्यांना मोठा फटका बसत असल्याचे दिसत आहे. 

वाशिम जिल्ह्यातील कुठल्याही शाळेसाठी वीज बिलाच्या रक्कमेची कुठलीही स्वतंत्र तरतूद अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही. शाळांच्या इमारतींची देखभाल-दुरूस्ती यासह अन्य खर्चासाठी मिळणाºया रक्कमेतूनच विजेचा खर्चही भागवावा लागतो. - गजानन बाजड, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, वाशिम

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरणSchoolशाळा