शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभेत ठराव घेवून पाणी आरक्षणाचा निर्णय घ्या - वाशिम जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 18:44 IST

वाशिम : पैनगंगा नदीवरील कोकलगाव, जुमडा बॅरेज परिसरातील नागरिकांसाठी बॅरेजमधून पिण्याचे पाणी आरक्षित करण्याची गरज आहे काय, यासंदर्भात ग्रामपंचायतींचा ठराव घेवून निर्णय घ्या, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना १९ मार्च रोजी दिले. 

ठळक मुद्दे गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवून उर्वरित पाणी एकबुर्जी प्रकल्पात आणण्यासाठी उपाययोजना करावी, असे पत्र आमदार लखन मलिक यांनी दिले होते.त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना उपरोक्त निर्देश दिले.

वाशिम : पैनगंगा नदीवरील कोकलगाव, जुमडा बॅरेज परिसरातील नागरिकांसाठी बॅरेजमधून पिण्याचे पाणी आरक्षित करण्याची गरज आहे काय, यासंदर्भात ग्रामपंचायतींचा ठराव घेवून निर्णय घ्या, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना १९ मार्च रोजी दिले. कोकलगाव, जुमडा बॅरेजमधून एकबुर्जी प्रकल्पात पाणी आणण्याकरिता शासनाने योजना मंजूर केली. मात्र, त्यास बॅरेज परिसरातील गावांचा विरोध होत आहे. तथापि, शेती, जनावरांसाठी पाणी आरक्षित ठेवून उर्वरित पाणी एकबुर्जीत सोडण्यास आमचा विरोध नसल्याचे संबंधितांशी चर्चा केल्यानंतर लक्षात आले. त्यामुळे संबंधित गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवून उर्वरित पाणी एकबुर्जी प्रकल्पात आणण्यासाठी उपाययोजना करावी, असे पत्र आमदार लखन मलिक यांनी जिल्हाधिकाºयांना १७ मार्च रोजी दिले होते. त्याची दखल घेत जिल्हाधिकाºयांनी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना उपरोक्त निर्देश दिले आहेत. पाण्याचा अपव्यय टाळण्याचे वाशिम न.प. ला आदेशएकबुर्जी प्रकल्पात आगामी जून महिन्यापर्यंत पुरेल, एवढा जलसाठा उपलब्ध आहे. मात्र, वाशिम नगर परिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याचे आमदार लखन मलिक यांनी जिल्हाधिकाºयांना कळविले होते. दरम्यान, १९ मार्च रोजी जिल्हाधिकाºयांनी वाशिम न.प. ला पत्र पाठवून पाण्याचा होणारा अपव्यय, ही अत्यंत गंभीर बाब असून त्यावर विनाविलंब नियंत्रण मिळविण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भातील कार्यवाही अहवाल तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असेही आदेशात नमूद आहे. पाण्याच्या अपव्ययामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याचे निदर्शनास आल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याधिकाºयांची राहील, असे कळविण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालयLakhan Malikलखन मलिक