शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढली ;  शेडनेट, पॉलीहाऊसच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 14:45 IST

वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गंत आता ईमुपालन, शेडनेट व पॉलीहाऊस अशा मध्यम मुदतीचे कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे ९ मे रोजी एका शासन आदेशाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता या योजनेच्या पूर्वीच्या निकषाप्रमाणे सरसकट प्रति कुटुंब दीड लाख पर्यंत कर्जमाफी मिळणार आहे.

वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गंत आता ईमुपालन, शेडनेट व पॉलीहाऊस अशा मध्यम मुदतीचे कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भात शासनाने ९ मे रोजी जारी केलेले आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत, अशी माहिती वाशिमचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत १२ मार्च २०१८ रोजी विधानभवनावर लाँग मार्च काढण्यात आला होता. त्यावेळी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी सन २००१ ते सन २००९ पर्यंत थकीत असलेल्या, परंतू सन २००८ ते २००९ च्या कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकरी खातेदारांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ देण्यात येईल तसेच इमूपालन, शेडनेट, पॉलीहाऊस याबाबत थकीत असलेल्या कर्जाचासुद्धा समावेश करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्या अनुषंगाने ९ मे रोजी एका शासन आदेशाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. त्यानुसार १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २००९ पर्यंत उचल केलेल्या पीक, मध्यम मुदत कर्जाची ३० जून २०१६ रोजी थकीत झालेल्या रकमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून, ३१ जुलै २०१७ पर्यंत मुद्दल व व्याजासह परतफेड न झालेल्या थकबाकीदार शेतकºयांना अल्प, अत्यल्प भूधारक याप्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता या योजनेच्या पूर्वीच्या निकषाप्रमाणे सरसकट दीड लाखपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २०१६ पर्यंत इमूपालन, शेडनेट व पॉलीहाऊस यासाठी मध्यम मुदत कर्ज घेतलेल्या व अशा कर्जापैकी ३० जून २०१६ रोजी थकित झालेल्या रकमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून ३१ जुलै २०१७ पर्यंतची मुद्दल व व्याजासह परतफेड न झालेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांचे अल्प, अत्यल्प भूधारक याप्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता या योजनेच्या पूर्वीच्या निकषाप्रमाणे सरसकट प्रति कुटुंब दीड लाख पर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. यासंदर्भात शासनाचे आदेश जिल्हाधिकारी, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक, जिल्हा कोषागार अधिकाºयांना प्राप्त झाले आहेत. 

 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची व्याप्ती वाढविण्यात आल्यासंदर्भात शासनाचे आदेश प्राप्त झाले आहेत. शासन आदेशानुसार व वरिष्ठांच्या सुचनेनुसार या निर्णयाची वाशिम जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाईल.- रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशिम.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी