शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्त शेतकर्‍यांना मिळणार रब्बी पीक कर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:35 IST

वाशिम : राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेतून कर्ज माफ झालेल्या शेतकर्‍यांना चालू रब्बी हंगामात पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच दुसरीकडे आचारसंहितेमुळे चावडी वाचन न झालेल्या गावांमध्ये दुसर्‍या टप्प्यात चावडी वाचन केले जात आहे. चावडी वाचनानंतर या गावातील शेतकर्‍यांची यादी अद्ययावत केली जाणार आहे.

ठळक मुद्दे कर्जमाफी योजनेतून कर्ज माफ झालेल्या शेतकर्‍यांना चालू रब्बी हंगामात पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेतून कर्ज माफ झालेल्या शेतकर्‍यांना चालू रब्बी हंगामात पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच दुसरीकडे आचारसंहितेमुळे चावडी वाचन न झालेल्या गावांमध्ये दुसर्‍या टप्प्यात चावडी वाचन केले जात आहे. चावडी वाचनानंतर या गावातील शेतकर्‍यांची यादी अद्ययावत केली जाणार आहे. वाशिम जिल्ह्यात एकूण २ लाख ६0 हजार शेतकर्‍यांनी कर्जमाफीसंदर्भात ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख २७ हजार शेतकर्‍यांनी अंतिम मुदतीपर्यंत ऑनलाइन अर्ज भरले आहेत. पात्र शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी तसेच यादी अचूक करण्याच्या दृष्टिकोनातून पहिला टप्प्यात गावस्तरावर चावडी वाचन घेण्यात आले. चावडी वाचनातून अचूक ठरणार्‍या अर्जांची पडताळणी व किरकोळ दुरुस्त्या केल्यानंतर कर्जमाफी योजनेत पात्र शेतकर्‍यांचा समावेश केला जात आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पात्र शेतकरी घेतले असून, अचूक अर्ज असलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ दिला जात आहे. १८ ऑक्टोबर रोजी कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात ३३ शेतकर्‍यांचा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते कर्जमाफी प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. ३0 ऑक्टोबरपर्यंत जवळपास ५0 हजार शेतकर्‍यांना कर्जमाफी प्रमाणपत्र देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जवळपास ७९ हजार १३८ लाभार्थी असून, अचूक अर्ज असणार्‍या शेतकर्‍यांच्या बँक खात्यांची पडताळणी सुरू केली आहे. कर्जमाफीचा लाभ मिळल्यानंतर या शेतकर्‍यांना रब्बी हंगामात पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. रब्बी हंगामात पीक कर्जाची उचल करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या खरिपाच्या तुलनेत अत्यल्प असते. तथापि, रब्बी हंगामात पीक कर्जाची मागणी नोंदविल्यानंतर कर्जमुक्त झालेल्या शेतकर्‍यांना विहित अटी व शर्तीच्या अधीन राहून संबंधित बँकेतून पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. दुसरीकडे राष्ट्रीयीकृत, खासगी, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या पात्र शेतकर्‍यांच्या बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व अर्जांची पडताळणी दुसर्‍या टप्प्यात केली जाणार आहे. साधारणत: १५ नोव्हेंबरपर्यंत पात्र ठरलेल्या सर्व शेतकर्‍यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्र दिले जाईल, अशी शक्यता जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी ‘लोकमत’शी बोलताना वर्तविली. 

टॅग्स :Farmerशेतकरी