शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्त शेतकर्‍यांना मिळणार रब्बी पीक कर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:54 IST

वाशिम: राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेतून कर्ज माफ झालेल्या शेतकर्‍यांना चालू रब्बी हंगामात पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर दुसरीकडे आचारसंहितेमुळे चावडी वाचन न झालेल्या गावांमध्ये दुसर्‍या टप्प्यात चावडी वाचन केले जात आहे. चावडी वाचनानंतर या गावातील शेतकर्‍यांची यादी अद्ययावत केली जाणार आहे.

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात मध्यवर्ती बँकेचा समावेश दुसर्‍या टप्प्यात चावडी वाचन 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेतून कर्ज माफ झालेल्या शेतकर्‍यांना चालू रब्बी हंगामात पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर दुसरीकडे आचारसंहितेमुळे चावडी वाचन न झालेल्या गावांमध्ये दुसर्‍या टप्प्यात चावडी वाचन केले जात आहे. चावडी वाचनानंतर या गावातील शेतकर्‍यांची यादी अद्ययावत केली जाणार आहे.यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्जमाफीच्या मुद्यावरून राज्यभरातील विविध संघटना तसेच शेतकर्‍यांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने सुकाणू समिती व शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करीत कर्जमाफी जाहीर  केली. दीड लाख रुपयांची र्मयादा घालून कर्जमाफी योजनेची प्रक्रिया राबविण्यात आली. वाशिम जिल्हय़ात एकूण २ लाख ६0 हजार शेतकर्‍यांनी कर्जमाफीसंदर्भात ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख २७ हजार शेतकर्‍यांनी अंतिम मुदतीपर्यंत ऑनलाइन अर्ज भरले आहेत; पात्र शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी तसेच यादी अचूक करण्याच्या दृष्टिकोनातून पहिल्या टप्प्यात गावस्तरावर चावडी वाचन घेण्यात आले. चावडी वाचनातून अचूक ठरणार्‍या अर्जांची पडताळणी व किरकोळ दुरुस्त्या केल्यानंतर कर्जमाफी योजनेत पात्र शेतकर्‍यांचा समावेश केला जात आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पात्र शेतकरी घेतले असून, अचूक अर्ज असलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ दिला जात आहे. १८ ऑक्टोबर रोजी कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात ३३ शेतकर्‍यांचा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते कर्जमाफी प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.  ३0 ऑक्टोबरपर्यंत जवळपास ५0 हजार शेतकर्‍यांना कर्जमाफी प्रमाणपत्र देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जवळपास ७९ हजार १३८ लाभार्थी असून, अचूक अर्ज असणार्‍या शेतकर्‍यांच्या बँक खात्यांची पडताळणी सुरू केली आहे. कर्जमाफीचा लाभ मिळल्यानंतर या शेतकर्‍यांना रब्बी हंगामात पीककर्ज उपलब्ध करून दिले जाईल. रब्बी हंगामात पीक कर्जाची उचल करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या खरिपाच्या तुलनेत अत्यल्प असते. तथापि, रब्बी हंगामात पीक कर्जाची मागणी नोंदविल्यानंतर कर्जमुक्त झालेल्या शेतकर्‍यांना विहित अटी व शर्तीच्या अधीन राहून संबंधित बँकेतून पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. दुसरीकडे राष्ट्रीयीकृत, खासगी, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या पात्र शेतकर्‍यांच्या बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व अर्जांची पडताळणी दुसर्‍या टप्प्यात केली जाणार आहे. साधारणत: १५ नोव्हेंबरपर्यंत पात्र ठरलेल्या सर्व शेतकर्‍यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्र दिले जाईल, अशी शक्यता जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी ‘लोकमत’शी बोलताना वर्तविली. 

चावडी वाचन .पहिल्या टप्प्यात निवडणूक आचारसंहिता नसलेल्या गावांत चावडी वाचन घेण्यात आले. आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्याने उर्वरित २७३ गावांत चावडी वाचन सुरू करण्यात आले आहे. लवकरच चावडी वाचनातून अद्ययावत यादी तयार केली जाणार आहे. त्यानंतर कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे.

कर्ज माफ झालेल्या शेतकर्‍यांना निश्‍चितच रब्बी हंगामात पीक कर्ज मिळणार आहे. शेतकर्‍यांनी संबंधित बँकेत तशी मागणी नोंदविल्यास कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. मध्यवर्ती बँकेच्या ५0 हजार शेतकर्‍यांना ३0 ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्याचे नियोजन आहे.- रमेश कटके,जिल्हा उपनिबंधक, वाशिम 

टॅग्स :Farmerशेतकरी