शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

उंद्री प्रकल्पात बुडून शेतक-याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 20:29 IST

पथकाला १ तासाच्या अथक परिश्रमानंतर शेतक-याचा मृतदेह शोधण्यात यश आले.

कामरगाव (वाशिम) : कारंजा तालुक्यातील बांबर्डा शिवाराला लागून असलेल्या उंद्री प्रकल्पात सिंचनाचे पाईप काढण्यासाठी बांबर्डा कानकिरड गेलेल्या शेतक-याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना ५ जून रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. अनंत रामदास भेंडे असे मृतक शेतक-याचे नाव आहे. 

बांबर्डा कानकिरड येथील शेतकरी अनंत भेंडे हे उंद्री प्रकल्पात सिंचनाचे पाईप काढण्याकरीता गेले असता ते पाण्यात बुडाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शनी नागरिकांनी बांबर्डा येथील गावकºयांना दिली. घटनेची माहिती मिळताच कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार धनंजय जगदाडे व धनज पोलिस स्टेशनचे ठाणेदार शिषिर मानकर यांनी तात्काळ आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले. सर्वधर्मआपतकालीन संस्था कारंजाच्या स्वयंसेवकांनी प्राथमिक शोध मोहीम राबविली. मात्र पाण्याची खोली अधिक असल्याने आपतकालीन पथकाला यश आले नाही. अखेर प्रशासनाने  पिंजर येथील संत गाडगेबाबा बचाव पथकास पाचारण केले.

या  पथकाला १ तासाच्या अथक परिश्रमानंतर शेतक-याचा मृतदेह शोधण्यात यश आले. बचाव पथकात दिपक सदाफळे, आशिक गुघडे, ऋषिकेश तायडे, मयुर जवके, ओम साबळे, ऋतिक सदाफळे, अंकुश सदाफळे, गोविंदा ढोके,यांचा समावेश होता. तर सर्वधर्मआपतकालीन पथकाचे शाम सवाई, ज्ञानेश्वर निंगोट, सतोंष घुले व भावेश गाडगे यांनी शोधमोहीमेत सहभाग नोंदविला. घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. मंडळ अधिकारी नायब तहसिलदार विनोद हरणे, आशा अदबाने, तलाठी घाटे, ग्रामसेवक दिलीप सकपाळ यांची यावेळी उपस्थिती होती. मृतक अनंत भेंडे हे बांबर्डा येथील सरपंच कांचन भेंडे यांचे पती आहेत. त्यांच्या मनमिळाउु स्वभावामुळे संपूर्ण तालुक्यात त्यांची वेगळी ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन बहिनी असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

टॅग्स :washimवाशिम