शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

शासकीय रेखाकला परीक्षा आवेदनपत्रक सादर करण्याला मुदतवाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 15:26 IST

वाशिम : शासकीय रेखाकला परीक्षेसाठी आवेदनपत्रक सादर करण्यास ५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासकीय रेखाकला परीक्षेसाठी आवेदनपत्रक सादर करण्यास ५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. यापूवी आवेदनपत्रक सादर करण्यास २७ जुलै अशी अंतिम मुदत होती.विद्यार्थ्यांमधील अंगभूत कलागुणांना चालना देण्यासाठी कला संचालनालयातर्फे शासकीय रेखाकला परीक्षा घेतली जाते. सन २०१९-२० या शैक्षणिक सत्रातील शासकीय रेखाकला परीक्षेसाठी शाळा, विद्यार्थ्यांकडून आवेदनपत्र मागविले आहेत. आवेदनपत्रक सादर करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत अर्थात २७ जुलैपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना आवेदनपत्रक सादर करता आले नाही तसेच काही परीक्षा केंद्रांमध्ये अपूरी बैठक व्यवस्था असल्याने नवीन केंद्रांना मंजूरी देण्याची मागणी समोर आली होती. याची दखल कला संचालनालयाचे (मुंबई) परीक्षा नियंत्रण नागेश वाघमोडे यांनी घेतली असून, ५ आॅगस्टपर्यंत आवेदनपत्रक सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. सहभागी शाळांना आता ५ आॅगस्टपर्यंत संबंधित केंद्राकडे आवेदनपत्रक सादर करावे लागणार आहेत तसेच संबंधित केंद्र प्रमुखांना एकत्रित आवेदनपत्रके १३ आॅगस्टपर्यंत कला संचालनालयाकडे पाठवावी लागणार आहेत. ज्या केंद्रांकडे बैठक व्यवस्थेनुसार नाव नोंदणी पूर्ण झाली असेल तर त्यांनी तातडीने कला संचालनालयाकडे आवेदनपत्रक पाठवावे, अशा सूचना परीक्षा नियंत्रकांनी दिल्या आहेत. 

 

शासकीय रेखाकला परीक्षेसाठी आवेदनपत्रक सादर करण्यास ५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. त्यानुसार ५ आॅगस्टपर्यंत शाळांमध्ये आवेदनपत्रक स्विकारले जाणार आहेत. शासकीय रेखाकला परीक्षेला बसू इच्छिणाºया विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत शाळांशी संपर्क साधून नोंदणी करावी.

- विठ्ठल सरनाईक,कला शिक्षक, श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, रिसोड जि. वाशिम

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्र