शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

लग्नाचा बस्ता घेऊन परतणाऱ्या कुटंबावर काळाचा घाला, कार अपघातात बापलेकी जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 16:52 IST

Accident News शनिवारी रात्री झालेल्या अपघातात शेंदुरजना ( जिल्हा बुलढाणा) येथील बापलेकीचा जागेवरच मृत्यू झाला.

ठळक मुद्देशिवकन्या एकनाथ शिंगणे हिचा लग्नाचा बसता घेण्यासाठी गेले होते.कारला - मेहकर कडून येणाऱ्या भरधाव कंटेनर ने समोरासमोर धडक दिली.दिनकर एकनाथ शिंगणे व कल्याणी दिनकर शिंगणे या दोघा बापलेकीचा जाग्यावरच मृत्यू झाला.

 शिरपूर जैन:  शिवकन्याचे लग्न अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्याची मोठ्या हर्षोल्लासात घरी तयारी सुरू होती. लग्नाचे कपडे आणण्यासाठी नववधू, तीची चुलत बहिण कल्याणी व कल्याणीचे वडिल दिनकर शिंगणे हे अन्य काही लोकांसमवेत अमरावतीला गेले. तेथून परत येत असताना भरधाव कंटेनरची कारला जबर धडक लागून कल्याणी व तीच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला. ही ह्रदयद्रावक घटना मालेगाव-मेहकर रस्त्यावरील सरहद पिंपरी गावानजिक शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली.प्राप्त माहितीनुसार बुलडाणा जिल्हयातील शेंदुरजना येथील दिनकर एकनाथ शिंगणे (४४), त्यांची मुलगी कल्याणी दिनकर शिंगणे (१८) हे अमरावती येथे कुटुंबियांसोबत शिवकन्या शिंगणे हिच्या लग्नाचा बसता घेण्यासाठी गेले होते. अमरावती येथून परत येत असताना शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सरहद पिंपरी येथे त्यांच्या एम. एच. ११ सी. डब्ल्यू ०४३६ या क्रमांकाच्या कारला मेहकरकडून येणाऱ्या भरधाव कंटेनरने (क्रमांक एम.एच. १७ बी.व्ही. ६४८९) समोरासमोर धडक दिली. या अपघातात दिनकर शिंगणे व कल्याणी शिंगणे या बापलेकीचा जागीच मृत्यू झाला; तर नंदकिशोर शिंगणे, अशोक शिंगणे, ज्ञानेश्वर शिंगणे, धनंजय शिंगणे, शिवकन्या शिंगणे व कारचालक योगेश बबन ईधारे हे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील वानखेडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

टॅग्स :washimवाशिमbuldhanaबुलडाणा