शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

धोक्याची घंटा : वाशिम जिल्हय़ात भुजल पातळीत चिंताजनक घट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 01:14 IST

वाशिम : गतवर्षीचा अपवाद वगळता गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील पावसाने सरासरी पातळी न ओलांडल्याने, तसेच सतत सुरू असलेल्या अर्मयाद पाणी उपशामुळे  जिल्ह्यातील भुजल पातळीत चिंताजनक घट झाली आहे. कारंजा, वाशिम, मंगरुळपीर, मानोरा, मालेगाव आणि रिसोड या सहा तालुक्यांच्या भूजल पातळीत लक्षणीय घटली आहे.

ठळक मुद्देपाच वर्षांत सरासरी १.७६ मीटरने खालावली पाणीपातळी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गतवर्षीचा अपवाद वगळता गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील पावसाने सरासरी पातळी न ओलांडल्याने, तसेच सतत सुरू असलेल्या अर्मयाद पाणी उपशामुळे  जिल्ह्यातील भुजल पातळीत चिंताजनक घट झाली आहे. कारंजा, वाशिम, मंगरुळपीर, मानोरा, मालेगाव आणि रिसोड या सहा तालुक्यांच्या भूजल पातळीत लक्षणीय घटली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या पाहणीत जिल्ह्यातील भूजल पातळीत मागील पाच वर्षांत सरासरी १.७६ मीटरने अर्थात पाच फुटाहून अधिक घटली आहे. अनिबर्ंध पाणी उपशामुळे भूजल पातळी घटत असल्याचे मत तज्ज्ञांचे आहे.जिल्ह्यात सरासरी ७९८.७0 मिलीमिटर पाऊस पडतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून यात अनियमितता दिसून येते. त्यामुळे जिल्ह्याची पर्जन्यमानाची सरासरी कमी-अधिक होऊ लागली. मात्र सर्व धरणांमध्ये पाणीसाठा पुरेसा होत असल्याने फारशी पाणी टंचाई जाणवत नाही. वाशिम जिल्ह्याचे भूगर्भीय क्षेत्र मुख्यत: दख्खन बस्तर लाव्हा या प्रकारच्या खडकाचे आहे; पूर्णपणे बेसॉल्टने आच्छादित असलेल्या या जिल्ह्यात काही ठिकाणी विघटित, तर काही ठिकाणी व्हेसिक्युकर झिओलिटिक प्रस्तराची झीज झाली आहे. यामुळे पडलेल्या भेगांमुळे सच्छिद्रता निर्माण होऊन भूजल साठा होण्यास मदत होते; परंतु  पावसाची प्रत्यक्ष सरासरी ही कागदावर मोठी दिसत असली तरी, गेल्या ५ वर्षांत जमिनीत मुरणारा पाऊस फारसा जिल्ह्यात पडलेला नाही. पडणार्‍या पावसाचा कालावधी कमी झाल्याने, तसेच पडलेल्या पावसाचे पाणी वेगाने वाहून जाते. याचा परिणाम भूजल पातळीवर होऊ लागला आहे. जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागाच्यावतीने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील मिळून प्रायोगिक तत्वावर ७९  विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले. यात २0१३ ते २0१८ ची सरासरी पाणी पातळी आणि जानेवारी २0१८ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात भूजल पातळी सरासरी १.७६ मीटरने घटल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यामध्ये कारंजा २.४१, रिसोड १.१८, मंगरुळपीर १.५३, वाशिम १.९३, मालेगाव १.३३ आणि मानोरा २.२३ असे भूजल पातळीचे तालुकानिहाय घटलेले प्रमाण आहे. भूजलपातळी वाढवण्यासाठी ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ अभियानाबरोबरच पाणी उपशावर निबर्ंध घालण्याची आवश्यकता आहे. भूजल पातळी घटल्याचा सर्वाधिक फटका बोअरवेल खोदाईला बसला आहे. यापूर्वी जिल्ह्याच्या कोणत्याही भागात सरासरी १५0 ते २00 फुटांपर्यत बोअरवेल खोदाई केली जात होती, पण गेल्या दोन वर्षांपासून ही खोदाई ३00 फुटांपयर्ंत पोहोचली आहे.

कारंजातील स्थिती सर्वात गंभीर!शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानासह कारंजा तालुक्यात पाणी फाऊंडेशनच्यावतीने गतवर्षी अर्थात २0१७ मध्ये लोकसहभाग आणि श्रमदानातून जलसंधारणाची मोठय़ा प्रमाणात कामे करण्यात आली आहेत. तथापि, याच तालुक्यातील भूजल पातळी ही जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाणात घटली असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्ष जानेवारी २0१८ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार या तालुक्यातील भूजल पातळी मागील पाच वर्षांत सरासरी २.४१ मीटरने घटली आहे. त्यामुळे या तालुक्यात झालेली जलसंधारणाची कामे उपयुक्त आहेत की नाही, ही बाब विचार करण्यास भाग पाडणारी आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी