शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दुग्ध व्यवसायातून १६ महिन्यात ४ लाखांची मिळकत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 16:06 IST

६५ रुपये प्रतिलिटरचा दर ठेऊनही ग्राहकांमधून गीर गायीच्या दुधाला वाढती मागणी असल्याची माहिती गोपालक संतोष कोरडे यांनी दिली.

- सुनील काकडे  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : भारतीय गोवंशामध्ये दुध उत्पादनाकरिता ‘गीर’ हा गोवंश प्रसिद्ध आहे. त्याच गीर गायीचे दूध विकून एका शेतकऱ्याने अवघ्या १६ महिन्यात ४ लाखांचे उत्पन्न मिळविण्याची किमया साध्य करून दाखविली. संतोष मोतीराम कोरडे (रा.फाळेगाव, ता. वाशिम) असे नाव असलेल्या या शेतकºयाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन परिसरातील इतरही असंख्य शेतकरी आता गीर गायीच्या संगोपनाकडे वळले आहेत.गुजरात राज्याचा पश्चिम व दक्षिण भाग, महाराष्ट्र राज्याचा गुजरातच्या सीमेलगतचा प्रदेश, राजस्थानातील ‘टोंक’ आणि ‘कोट’ हे जिल्हे ‘गीर’ गोवंशांचे उगमस्थान मानले जातात. याच भागात प्रामुख्याने गीर गोवंशाची मोठ्या प्रमाणात संशोधनात्मक तथा उत्तमरित्या गीर गोवंशनिर्मिती केली जाते. त्याचा सखोल अभ्यास करून वाशिम येथील देशी गोपालक रवि मारशेटवार यांनी काही प्रयोगशिल शेतकऱ्यांना गीर गोपालनासाठी प्रोत्साहित केले. यामाध्यमातून वंदे गो मातरम या नावाने स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी गटाचे सदस्य संतोष कोरडे यांनी गत ५ वर्षांपासून गीर गायीच्या संगोपनाचा ध्यास घेतला. गत १६ महिन्यांत त्यांनी ६५ रुपये प्रतिलिटर दराने गीर गायीच्या ६२५५ लिटर दुधाची वाशिम शहरातील घरोघरी जाऊन विक्री केली. त्यासाठी ग्राहकांचे भलेमोठे नेटवर्क देखील त्यांनी उभे केले. ६५ रुपये प्रतिलिटरचा दर ठेऊनही ग्राहकांमधून गीर गायीच्या दुधाला वाढती मागणी असल्याची माहिती गोपालक संतोष कोरडे यांनी दिली.गीर गाय प्रतीदिवस १६ लिटर दुध देते. दुध देण्याची अशी क्षमता भारतीय देशी जातीच्या इतरही अनेक गायींमध्ये आहे. पशुसंवर्धन विभागातील तज्ज्ञांनी आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा अवलंब करून नि:शुल्क सेवा दिल्यास वर्षभरात गीर गायीपासून किमान ८ ते १२ गीर गायीच्या कालवडी जन्माला येऊ शकतात. यामुळे निसर्गाच्या दग्याफटक्यामुळे दरवर्षी अडचणीत येणाºया शेतकºयांची आर्थिक स्थिती मजबूत होऊन त्यांचे जीवनमान उंचावू शकते. शासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत वंदे गो मातरम शेतकरी गटाचे प्रणेते रवि मारशेटवार यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीMilk Supplyदूध पुरवठा