शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

‘आईला मारहाण करून पप्पांनी तीला झोक्याला बांधले’ - चिमुकल्या श्रद्धाचे बयाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 17:40 IST

शिरपूरजैन (वाशिम) : ‘आधी गालात झापडा मारून त्यानंतर माझ्या आईला पप्पांनीच झोक्याला बांधले’, असे बयाण चार वर्षे वयाच्या चिमुकल्या श्रद्धाने दिल्यामुळे मृतक सुनिताची हत्या तिचा पती धनंजय बोडखे यानेच केली असावी, असा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्दे‘तुझ्या पोटी मुलीच का जन्माला येतात’, असा प्रश्न वारंवार करून सुनिताचा पती धनंजय हा तिला नेहमीच मारहाण करून त्रास द्यायचा. २४ मे रोजी सायंकाळी ७ वाजता सुनिताचा मृतदेह झोक्याला गळफास लागलेल्या स्थितीत आढळून आला. सुनिताचा पती धनंजयने ही आत्महत्या असल्याचे भासविण्याचा पूर्ण प्रयत्न करून तेथून तत्काळ पळ काढला.

शिरपूरजैन (वाशिम) : ‘आधी गालात झापडा मारून त्यानंतर माझ्या आईला पप्पांनीच झोक्याला बांधले’, असे बयाण चार वर्षे वयाच्या चिमुकल्या श्रद्धाने दिल्यामुळे मृतक सुनिताची हत्या तिचा पती धनंजय बोडखे यानेच केली असावी, असा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे मात्र ज्या आईच्या उदरातून जन्म घेतला, तीच आज या जगात नाही आणि तीला मारणारा स्वत:चा बापही गुन्हा सिद्ध झाल्यास पुढचे अनेक वर्षे कारागृहात जाणार असल्याने श्रद्धासह अडीच वर्षे वयाची सलोनी आणि सहा महिने वयाची आराध्या अशा तीघी बहिणी माय-बापाच्या प्रेमाला मुकणार आहेत. या ह्रदयद्रावक घटनेप्रती समाजातील सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.२४ मे २०१८ रोजी घडलेल्या या घटनेची अधिक माहिती अशी, की शिरपूर येथील जगन्नाथ काठोळे यांची मुलगी सुनिता हिचा विवाह ५ वर्षांपूर्वी भापुर (ता.रिसोड) येथील धनंजय बोडखे याच्याशी झाला होता. दरम्यानच्या काळात या दाम्पत्यास तीन गोंडस मुली झाल्या. मात्र, ‘तुझ्या पोटी मुलीच का जन्माला येतात’, असा प्रश्न वारंवार करून सुनिताचा पती धनंजय हा तिला नेहमीच मारहाण करून त्रास द्यायचा. दरम्यान, मुलीला होत असलेल्या त्रासाची दखल घेवून सुनिताचे वडिल जगन्नाथ काठोळे यांनी तिला व तिच्या पतीला शिरपूरमध्ये वास्तव्यास आणले. याठिकाणी हे दाम्पत्य आपल्या तीन मुलींसह धोंडू तागड यांच्या घराच्या दुसºया मजल्यावरील खोलीत भाड्याने वास्तव्य करित होते. अशात २४ मे रोजी सायंकाळी ७ वाजता सुनिताचा मृतदेह हा, तिच्या सहा महिने वयाच्या मुलीसाठी घरात बांधण्यात आलेल्या झोक्याला गळफास लागलेल्या स्थितीत आढळून आला. सुनिताचा पती धनंजयने ही आत्महत्या असल्याचे भासविण्याचा पूर्ण प्रयत्न करून तेथून तत्काळ पळ काढला. दरम्यान, ही आत्महत्या नसून धनंजयनेच माझ्या मुलीची हत्या केल्याची तक्रार सुनिताचे वडिल जगन्नाथ काठोळे यांनी पोलिसांत दाखल केली. त्यावरून २५ मे रोजी धनंजयविरूद्ध कलम ४९८ ‘अ’, ३०२ भादंविअन्वये गुन्हा दाखल झाला. याचदिवशी सायंकाळी पोलिसांनी सुनिताची चार वर्षे वयाची मुलगी श्रद्धा हिचेही बयाण नोंदविले. त्यात तिने ‘आधी गालावर झापडा मारून पप्पांनीच आईला झोक्याला बांधले’, असे नमूद केले. यास तपास अधिकारी तथा पोलिस उपनिरीक्षक मुपडे यांनीही दुजोरा दिला. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच सर्व बाबी स्पष्ट होतील, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, समाजमन सुन्न करणाºया या घटनेमुळे मात्र खेळण्या-बागडण्याच्या वयात असलेल्या तीन चिमुकल्या मुली कायमच्या अनाथ होण्याच्या उंबरठ्याप्रत पोहचल्याने याप्रती सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात आजही ‘मुलगाच हवा’!शिरपूरमध्ये घडलेल्या या घटनेमागे सुनिताच्या पोटी तीन मुलीच आल्याचे आणि मुलगा नसल्याचे एक मुख्य कारण असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. यावरून ग्रामीण भागातील अनेक मंडळी आजही ‘मुलगाच हवा’, या बुरसटलेल्या मानसिकतेतून बाहेर पडली नसल्याचे सिद्ध होत आहे. शासनस्तरावरून मोठा गाजावाजा करून राबविल्या जाणाºया ‘बेटी बचाव’, या मोहिमेचेही विशेष फलित अद्याप झाले नसल्याचे या घटनेवरून अधोरेखीत होत असल्याची चर्चा होत आहे.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैनCrimeगुन्हा