सायकलने बावीसशे किमीचे अंतर कापणारवाशीम - सायकलस्वार ग्रुपच्या वाशीम ते जम्मु अशा बावीसशे किलोमिटरच्या मोहीमेला रविवार 14 मे ला सुरुवात करण्यात आली. या मोहीमेचा प्रारंभ स्थानिक शिवाजी चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हारार्पण करुन करण्यात आला. यावेळी तहसिलदार बळवंत अरखराव यांनी सायकलस्वार ग्रुपला हिरवी झेंडी दाखवून मोहीमेचा प्रारंभ केला. तसेच उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्यासह शहरातील प्रतिष्ठीत मंडळींनी उपस्थिती राहून सायकलस्वार ग्रुपला शुभेच्छा दिल्या. वाशीम ते जम्मु अशा या सायकल प्रवासामध्ये श्रीनिवास व्यास, मनीष मंत्री, आदेश कहाते, कृष्णकांत इंगोले, हरक पटेल, यश शिंदे, गजानन इंगोले, रेखा रावले, सागर रावले, सुधाकर संगवर, दीपक एकाडे, आशिष शर्मा, श्रीरंग गुजरे, नीरज चोरले, सुरज शर्मा या पंधरा सायकलपटुंनी सहभाग घेतला आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने नियमितपणे सायकल चालवुन निरोगी राहावे असा संदेश या मोहीमेच्या माध्यमातून सायकलपटुंनी दिला.
सायकलस्वार ग्रुपची वाशीम ते जम्मु मोहीमेला सुरुवात
By admin | Updated: May 14, 2017 20:12 IST