शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

‘सीटी स्कॅन’ मशिन कार्यान्वित; रुग्ण तपासणीकडे कानाडोळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 15:23 IST

गत महिनाभरात केवळ १० रुग्णांचे ‘सीटी स्कॅन’ करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : किरकोळ बाबीवरून आठ महिने धुळखात पडलेली जिल्हा सामान्य रुग्णालयातील सीटी स्कॅन मशिन १४ जानेवारीला रुग्णसेवेत आली खरी; परंतू एका महिन्याच्या कालावधीत केवळ १० रुग्णांना याचा लाभ झाला. यावरून गोरगरीब रुग्णांचे सीटी स्कॅन करण्यासंदर्भात आरोग्य विभागाचे धोरण उदासीन असल्याचे दिसून येते.गोरगरीब रूग्णांना आरोग्यविषयक सेवा मोफत तसेच माफत दरात उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागातर्फे सरकारी रुग्णालयाची निर्मिती केली जाते. वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात साधारणत: १० महिन्यांपूर्वी सात कोटी रुपये किंमत असलेली सीटी स्कॅन मशिन प्राप्त झाली होती. परंतू, विद्युत विषयक कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने ही मशिन पाच महिने धूळ खात पडली होती. यासंदर्भात ‘लोकमत‘ने वृत्तही प्रकाशित केले होते. विद्युतविषयक कामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून जवळपास ७.५० लाखांचा निधी जिल्हा सामान्य रुग्णालयाला मिळाला. त्यानंतर विद्युतविषयक कामे पुर्णत्वाकडे जाण्यास दिरंगाई झाल्याने सीटी स्कॅन मशिन कार्यान्वित झाली नव्हती. यासंदर्भात ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित करून महावितरण व आरोग्य विभागाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत संबंधित यंत्रणेने १४ जानेवारी रोजी सीटी स्कॅन मशिन कार्यान्वित केली. परंतू, यासंदर्भात कोणतीही जनजागृती नसल्याने गरजू रुग्णांना या सीटी स्कॅन मशिनचा म्हणावा तेवढा फायदा मिळत नसल्याचा दावा रुग्ण व नातेवाईकांनी केला. गत महिनाभरात केवळ १० रुग्णांचे ‘सीटी स्कॅन’ करण्यात आले. जाचक अटी सांगून गरजू रुग्णांना खासगी दवाखान्यात जाण्याचा सल्लाही दिला जातो. यामुळे रुग्णांना आर्थिक झळ बसते. सीटी स्कॅन मशिन कार्यान्वित झाल्यासंदर्भात तसेच यासाठी पात्र लाभार्थी कोण यासंदर्भात जनजागृती व्हावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य चरण गोटे यांनी सोमवारी केली

जिल्हा सामान्य रुग्णालयात सीटी स्कॅन मशिन प्राप्त झालेली आहे. मध्यंतरी थ्री फेज जोडणी व अन्य विद्युतविषयक कामाअभावी सीटी स्कॅन मशिन कार्यान्वित झाली नव्हती. १४ जानेवारीपासून ही मशिन कार्यान्वित झाली आहे. पात्र रुग्णांची सीटी स्कॅन तपासणी करण्याच्या सूचना सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. आतापर्यंत निश्चित किती रुग्णांना या सिटी स्कॅनचा लाभ झाला, सांगता येऊ शकणार नाही.- डॉ. अंबादास सोनटक्केजिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमhospitalहॉस्पिटल