शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आपले सरकार केंद्राकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची लूट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 11:30 IST

सरसकट सहा हजार रुपये वसूल करून ग्रामपंचायतींची सर्रास आर्थिक लूट केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘आपले सरकार सेवा’तर्फे ग्रामपंचायतींकडून संगणक परिचालकांचे मानधन हे उपस्थितीनुसार न घेता, सरसकट सहा हजार रुपये वसूल करून ग्रामपंचायतींची सर्रास आर्थिक लूट केली जात आहे. परंतू, ‘आपले सरकार सेवा’ मात्र संगणक परिचालकांना हजेरीनुसार मानधन देत आहे. दुसरीकडे १० ते १५ ग्राम पंचायतींमधील संगणक आॅपरेटर सोडून गेलेले असताना तसेच १५ ते २० ग्रामपंचायतींमध्ये वीजपुरवठा खंडीत असतानाही, ग्रामपंचायतींकडून दरमहा सहा हजार रुपये घेत लूट करीत आहेत.ग्रामपंचायतींमधून मिळणारे विविध प्रकारचे दाखले आॅनलाईन पद्धतीने मिळावे, कामात सुसूत्रता यावी, प्रशासकीय दिरंगाई होऊ नये म्हणून ग्रामपंचायतींच्या कारभाराला आॅनलाईनची जोड देण्यात आली. जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायती असून, येथे आपले सरकार सेवा सुरू करण्यात आली. नियमित मानधन मिळत नसल्याने १० ते १५ ग्रामपंचायतींमधील संगणक आॅपरेटर तीन, चार महिन्यात सोडून गेले तर १५ ते २० ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडीत असल्याने तेथे आपले सरकार सेवा प्रभावित आहे. दुसरीकडे संगणक परिचालकाचे मानधन, चालकाचा प्रशिक्षण खर्च, कंपनी व्यवस्थापन आदींसाठी प्रत्येक ग्राम पंचायतीला दरमहा १०४५० व जीएसटी १८ टक्के असे एकूण १२३३१ रुपयाचे धनादेश जिल्हा परिषदच्या नावाने जमा करावे लागतात. संगणक परिचालकासाठी दरमहा सहा हजार रुपये ग्रामपंचायतींकडून वसूल केले जातात. परंतू, आपले सरकार सेवाद्वारे संगणक चालकांना उपस्थितीनुसारच पैसे देत आहेत. परंतु ग्रामपंचायतीकडून पूर्ण महिन्याचे पैसे घेतले जात असल्याने ही एकप्रकारे ग्रामपंचायतींची लूट असल्याच्या प्रतिक्रिया सरपंच संघटनेमधून उमटत आहेत.

ग्रामपंचायतींना आॅनलाईनची जोड मिळाली ही बाब स्तुत्य आहे. परंतू, बहुतेक ग्रामपंचायतीचे उत्पन्न खूप कमी आहे. उत्पन्न कमी असतानाही आपले सरकार सेवा यासाठी दरमहा १२ हजार रुपये द्यावे लागतात. संगणक आॅपरेटरच्या मानधनासाठी ग्रामपंचायतीकडून दरमहा सहा हजार रुपये घेतले जातात. दुसरीकडे व्यवस्थापनाकडून आॅपरेटरला उपस्थितीनुसार मानधन दिले जाते.- विनोद पट्टेबहादूरसरपंच, सुपखेला ता.वाशिम

शासनाने अनेक दाखले बंद केले. संगणक चालकाना वेळेवर वेतन मिळत नसल्याने काहींनी काम सोडले. त्यामुळे त्या ग्रामपंचायतींकडून संगणक आॅपरेटरच्या नावाखाली पैसे आकारू नये. दरमहा संगणक चालकाचा प्रशिक्षण खर्च १३०० रुपये घेतले जातात. दुसरीकडे प्रशिक्षण कार्यक्रमही नाही. या प्रकरणात सरपंचांना विश्वासातही घेतले जात नाही. - दीपक खडसेसरपंच, खरोळा ता.वाशिम

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत