शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

भाजीबाजारात गर्दी कायम; हर्रासी बंद करण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 12:44 IST

४ एप्रिलपासून हर्राशी बंद करण्याचा निर्णय व्यापारी, आडतदारांनी घेतला. 

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : जीवनावश्यक वस्तू म्हणून भाजीपाला हर्राशी शिरपूर येथील गुजरी भागात दररोज सुरू आहे. मात्र, या ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असल्याने शनिवार, ४ एप्रिलपासून हर्राशी बंद करण्याचा निर्णय व्यापारी, आडतदारांनी घेतला. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संचारबंदी लागू केलेली आहे. जिल्ह्यातील आठवडी बाजारही रद्द केले असून, गर्दी होऊ नये म्हणून भाजीबाजार वेगवेगळ्या ठिकाणी भरविण्यात येत आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दिलेल्या आहेत.  या सूचनांची अंमलबजावणी शिरपूर येथे होत नसल्याचे ३ एप्रिल रोजीदेखील भाजीपाला हर्रासी करताना दिसून आले. मालेगाव तालुक्यातील सर्वात मोठी व्यापारपेठ म्हणून शिरपूरची ओळख आहे. जिल्ह्यात भाजीपाला उत्पादनासाठी शिरपूर ओळखले जात असून, येथे दररोज भाजीपाला हर्रासी केली जाते. बुधवारला आठवडी बाजार असतो. जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांच्या निर्देशानुसार आठवडी बाजार पूर्णत: बंद आहे. गुजरी भागात ३० मार्चपर्यंत भाजीपालावर्गीय वस्तूची हर्राशी केली जात होती. मात्र तेथील होणारी गर्दी धोकादायक वाटत असल्याने गावाबाहेरील आसेगाव रोडस्थित आठवडी बाजारच्या जागेत ३१ मार्चपासून हर्राशी सुरू केली. तेथेही व्यापारी व नागरिकांकडून भाजीपाला खरेदीसाठी मोठी गर्दी होऊ लागली. हे लक्षात घेऊन आठवडी बाजारात दोन ठिकाणी ५० फुटाच्या अंतरावर भाजीपाला हर्राशी करण्याच्या सूचना स्थानिक दक्षता समितीने दिल्या. मात्र तरीसुद्धा ३ एप्रिल रोजी भाजीपाला हर्राशी वेळी मोठी गर्दी झाली. येथे सोशल डिस्टन्सिंगचा कोणताही नियम पाळण्यात आला नाही. नागरिकांच्या वाढत्या गर्दीचा धोका लक्षात घेऊन भाजीपाला आडतदार विकास चोपडे, संजय बाविस्कर यांनी भाजीपाला हर्राशी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून सदर निर्णयाची अंमलबजावणी शनिवार, ४ एप्रिलपासून करणार असल्याचे विकास चोपडे यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन