शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

बँकांसमोर गर्दी; फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 16:56 IST

बँकांसमोर नागरिकांची गर्दी होत असून, फिजिकल डिस्टन्सिंगही पाळले जात नसल्याचे १९ मे रोजी दिसून आले. 

लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव : कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी बँकांसमोर गर्दी करू नये असे आवाहन तालुका व जिल्हा प्रशासनातर्फे केले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र येथील बँकांसमोर नागरिकांची गर्दी होत असून, फिजिकल डिस्टन्सिंगही पाळले जात नसल्याचे १९ मे रोजी दिसून आले. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले. ग्राहकांची सोय व्हावी आणि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये याकरता जिल्ह्यात बँकेची वेळ सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत करण्यात आली. संचारबंदी आदेश लागू असल्याने जमाव करण्यास मनाई आहे. फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून बँकांनी व्यवहार ठेवावे, नागरिकांनी बँकेत किंवा बँकेसमोर गर्दी करू नये, अशा सूचना तालुका तसेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत. काही दिवस फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत गर्दी टाळली होती. परंतू, आता पुन्हा बँकेत तसेच बँंकांसमोर गर्दी होत असल्योच दिसून येते. येथील जुन्या बस स्थानकावर असलेल्या सेंट्रल बँक समोर मंगळवारी सकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे तिथे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसले. सर्व सुरळीत सुरु असताना लोकांनी बँक समोर खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पोलिस प्रशासनाच्या आणि नगर पंचायतीच्या कारवाया सुद्धा थंडावल्याने आणि बँक प्रशासनानेही फिजिकल डिस्टन्सिंगकरीता योग्य ती खबरदारी न घेतल्याने बँकांसमोर गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. मंगळवार, १९ मे रोजी सेंट्रल बँकेच्या व्यवस्थापकांनी बारा वाजता लंच टाईम सांगून बारा ते साडेबारा बँक बंद केली होती. व्यवहार बंद झाल्याने बँकेसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असल्याने तिथे वाहतूक सुद्धा जाम झाली होती.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्याbankबँक