शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

'फिजिकल डिस्टन्सिंग'चा फज्जा : बँकांसमोरील गर्दी हटता हटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 17:09 IST

र्थसहाय्य योजनेंतर्गतची रक्कम काढणे, पीककर्ज आदी कारणांसाठी राष्ट्रीयकृत बँकांसमोर लाभार्थी, नागरिकांची गर्दी होत आहे.

 रिसोड/शिरपूर : कोरोना विषाणूचा संसबँकांसमोरील गर्दी हटता हटेना !र्ग होऊ नये म्हणून नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले. संचारबंदी लागू असल्याने ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात आहे. तथापि, काही नागरिकांकडून अद्याप आवश्यक ती खबरदारी घेतली जात नसल्याचे मंगळवार, १२ मे रोजी रिसोड व शिरपूर येथील बँकांसमोरील गर्दीवरून दिसून आले.जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकमेव रूग्ण आहे. तथापि, सावधगिरीचा प्रयत्न म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे शासन आदेशाची कठोर अंमलबजावणी केली जात आहे. संचारबंदी आदेश लागू असल्याने जमाव करण्यास मनाई आहे. फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून बँकांनी व्यवहार ठेवावे, नागरिकांनी बँकेत किंवा बँकेसमोर गर्दी करू नये, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने बँक तसेच नागरिकांना वारंवार दिल्या आहेत. काही दिवस फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत गर्दी टाळली जाते; मात्र, तीन, चार दिवसात पुन्हा जैसे थे परिस्थिती होते. मंगळवार, १२ मे रोजी रिसोड येथील काही राष्ट्रीयकृत बँकेसमोर नागरिकांची तसेव विविध प्रकारच्या शिष्यवृत्तीची रक्कम काढण्यासाठी शिरपूर येथे विद्यार्थ्यांची बँकेसमोर गर्दी झाल्याचे दिसून आले. विविध अर्थसहाय्य योजनेंतर्गतची रक्कम काढणे, पीककर्ज आदी कारणांसाठी राष्ट्रीयकृत बँकांसमोर लाभार्थी, नागरिकांची गर्दी होत आहे. रिसोड शहरातील काही  बँकांसमोर विशिष्ट अंतरावर वर्तुळ रंगविण्यात आले नाही. त्यामुळे एका मागोमाग एक असे नागरीक उभे असल्याचे १२ मे रोजी दिसून आले. कोरोना विषाणूचा संसर्ग हा एकापासून दुसºयाला होत असल्यामुळे नागरिकांनीदेखील स्वत:हून काळजी घेऊन गर्दी होणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. परंतू, काही नागरिक याबाबत गंभीर नसल्याचे बँकांसमोरील व बँकांमधील गर्दीवरून दिसून येते.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडShirpur Jainशिरपूर जैन