लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव पो. स्टे. : परिसरातील सर्वदूर पिके बहरावर आली असताना गेल्या सात ते आठ दिवसांपासून पावसाने पुन्हा हुलकावणी दिल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत.सध्या आसेगाव परिसरातील शेतांमध्ये सोयाबीन, मूग, उडीद आदी पिके बहरली आहेत. फुलधारणा झालेली ही पिके आगामी काही दिवस टिकून राहण्याकरिता आता पावसाची नितांत गरज भासत आहे. मात्र, पावसाचा थांगपत्ता नसल्यामुळे फुलांची गळती सुरू झाली आहे. त्याचा थेट परिणाम प्रत्यक्ष उत्पादनावर होणार असून, आधीच अडचणीत असलेला शेतकरी यामुळे चिंताग्रस्त झाला आहे. पिकांची अशी दयनीय अवस्था असताना मोठ्या पावसाअभावी जलस्रोतांची पाणीपातळीदेखील झपाट्याने खालावत चालली आहे. यामुळे काही ठिकाणी टंचाईसदृश स्थिती उद्भवली आहे. परिसरातील सिंचन प्रकल्पही अद्याप कोरडे असून, गत सात दिवसांपासून आकाशात ढग दाटून येत असताना पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, लवकरच मोठा पाऊस न झाल्यास हाता-तोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पावसाअभावी पिके सापडली पुन्हा संकटात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:07 IST
लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव पो. स्टे. : परिसरातील सर्वदूर पिके बहरावर आली असताना गेल्या सात ते आठ दिवसांपासून पावसाने पुन्हा हुलकावणी दिल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत.सध्या आसेगाव परिसरातील शेतांमध्ये सोयाबीन, मूग, उडीद आदी पिके बहरली आहेत. फुलधारणा झालेली ही पिके आगामी काही दिवस टिकून राहण्याकरिता आता पावसाची नितांत गरज भासत आहे. ...
पावसाअभावी पिके सापडली पुन्हा संकटात!
ठळक मुद्दे शेतकरी हवालदिलसोयाबीनला पावसाची प्रतीक्षा!पावसाने पुन्हा हुलकावणी दिल्यामुळे शेतकरी चिंतातुर