शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
2
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
3
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
4
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
5
"महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार", जयराम रमेश यांचा दावा
6
काँग्रेस नेते राहुल गांधींना पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
7
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
8
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
9
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
10
निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले, परंतु...; नरसय्या आडम यांचं खळबळजनक विधान
11
"मी भारताकडून खेळणार म्हणजे खेळणारच, बाकी मला...", रियान परागचं विधान
12
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
13
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
14
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
15
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
16
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
17
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
18
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल
19
"प्रचार करताना तर काहीच त्रास झाला नाही, मग ..."; केजरीवालांच्या तब्येत ठीक नसल्याच्या दाव्यावर EDचे प्रत्युत्तर
20
व्लादिमीर पुतिन यांना उत्तराधिकारी मिळाला? या मोठ्या पदावर केली नियुक्ती, जाणून घ्या कोण आहेत?

८४ हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 12:19 PM

Crop loans distributed to 84,000 farmers : जिल्ह्यातील ८४ हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत जिल्ह्यातील ८४ हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.गतवर्षातील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानातून स्वत:ला सावरत यंदा शेतकऱ्यांनी नव्या जोमाने खरीप हंगामाची तयारी केली. शेती मशागत, बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची आवश्यकता असते. यंदा चार लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झालेली असून, सर्वाधिक पेरा सोयाबीनचा आहे. दरम्यान, शेती मशागतीसाठी पीक कर्ज काढताना शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून यंदा कोरोनाकाळातही बँक सुरू ठेवण्यास मुभा होती. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना बँकेसमोर रांगेत उभे राहावे लागले. यंदाही राष्ट्रीयीकृत बँकांपेक्षा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पीक कर्ज वितरणात आघाडी घेतली आहे. ३५ टक्के राष्ट्रीयीकृत बँकांचा अपवाद वगळता उर्वरित बँकांनी मात्र पीककर्ज वितरणात हात आखडता घेतल्याचे दिसून येते. गतवर्षी १५ जुलैपर्यंत ७२ हजार २० शेतकऱ्यांना सुमारे ५१६ कोटी ७७ लाख रुपये पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. यंदा आतापर्यंत ८४ हजार शेतकऱ्यांना ६८७ कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पीक कर्ज वितरणाच्या टक्केवारीत वाढ असल्याचे दिसून येते.  

टॅग्स :Crop Loanपीक कर्जwashimवाशिमFarmerशेतकरी