शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

९१ हजार शेतकऱ्यांना पीककर्ज; नवीन खातेदार केवळ ३७६५

By दिनेश पठाडे | Updated: June 21, 2023 17:39 IST

नुतनीकरण केल्यामुळेच वाढला पीककर्ज वाटपाचा टक्का

वाशिम : मागील चार वर्षांच्या तुलनेत यंदा सुरुवातीच्या काही दिवसांतच विक्रमी कर्जवाटप झाले आहे. यापूर्वी पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी कर्जाचे नुतनीकरण केल्यामुळेच कर्जाची टक्केवारी वाढली असल्याचे दिसून येते. २१ जूनपर्यंत ९१ हजार २५९ हजार शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप झाले असून त्यापैकी ८७ हजार ४९४ शेतकऱ्यांनी कर्जाचे नुतनीकरण केले आहे. तर केवळ ३ हजार ७६५ नवीन खातेदार शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीककर्ज मिळाले आहे.

खरीप हंगाम २०२३-२४ साठी जिल्ह्याला १ हजार ४०४ कोटी ८४ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. ज्याचा लाभ १ लाख २१ हजार ९८८ शेतकऱ्यांना होणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात १ एप्रिलपासून कर्जवाटपास सुरुवात झाली असून २१ जूनपर्यंत ७४.८१ टक्के शेतकऱ्यांना कर्जवाटप केले. रकमेनुसार ६३.६३ टक्के कर्जवाटप झाले आहे. यंदा सार्वजनिक, खासगी क्षेत्रासह मध्यवर्ती आणि विदर्भ बँकेने कर्जवाटपात सातत्य राखल्याने टक्केवारी वाढली आहे. शिवाय अधिकाधिक शेतकऱ्यांना पेरणीपूर्वीच कर्ज मिळत असल्याने पेरणीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना तयारी करणे शक्य होत आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करण्यास प्राधान्य दिले. कर्जाची रक्कम भरल्यानंतर बँकांनी काही प्रमाणात वाढीव कर्ज देऊन पीककर्जाचे नुतनीकरण केले. त्यामुळे कर्जवाटपाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नवीन खातेदार शेतकऱ्यांची संख्या अपेक्षित नसल्याची स्थिती आहे.नवीन खातेदारांना ४५.६९ कोटी वाटपजिल्ह्यात आतापर्यंत ३७६५ नवीन खातेदार शेतकऱ्यांना ४५ कोटी ६९ लाख ४६ हजार रुपयांचे कर्जवाटप केले आहे. नवीन खातेदारांना कर्जवाटप करण्यात खासगी क्षेत्रातील बँका आघाडीवर आहेत. दरम्यान, नुतनीकरण केलेल्या ८७ हजार ४९४ शेतकऱ्यांना ८४८ कोटी २४ लाख ३३ हजार रुपयांचे कर्जवाटप केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी