शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

तणनाशक फवारल्याने पिकेच करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 16:33 IST

पिकांतील तणाचे नियंत्रण करण्यासाठी फवारण्यात आलेल्या तणनाशक औषधांमुळे सोयाबीनचे पिकच करपले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: पिकांतील तणावर नियंत्रण मिळविण्यासाठी फवारणी केलेल्या तणनाशक औषधांमुळे पिकेच करपल्याच्या घटना घडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. प्रामुख्याने सोयाबीन पिकाला तणनाशकाचा फटका बसला असून, कृषी विभागाने या नुकसानाची पाहणी करण्यासह संबंधित कंपनीवर कारवाई करावी आणि नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. मानोरा, मंगरुळपीर आणि वाशिम तालुक्यात ५० एकर क्षत्रातील पिके निकृष्ट तणनाशकामुळे करपली आहेत.वाशिम जिल्ह्यात कृषी विभागाच्या ९ जुलै रोजीच्या अहवालानुसार ३ लाख ३१ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे. त्यात सोयाबीनचे प्रमाण अधिक आहे. जल्ह्यात सद्यस्थितीत २ लाख ४४ हजार ६५७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, ५२ हजार १३८ हेक्टर क्षेत्रावर तूर, २० हजार २३२ हेक्टर क्षेत्रावर कपाशी, ७ हजार २४६ क्षेत्रावर उडिद, तर ५ हजार ४५५ हेक्टर क्षेत्रावर मुग या प्रमुख पिकांसह ज्वारी, मका, सुर्यफुल, ऊस आणि इतर पिकांचीही काही प्रमाणात पेरणी झाली आहे. आता पावसाने दडी मारल्यामुळे पिके करपत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यातच पिकांतील तणाचे नियंत्रण करण्यासाठी फवारण्यात आलेल्या तणनाशक औषधांमुळे सोयाबीनचे पिकच करपले आहे. मानोरा तालुक्यातील खापरी, गिर्डा येथील १५, मंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी येथील दोन आणि वाशिम तालुक्यातील एक शेतकरी मिळून एकूण १८ शेतकºयांना निकृष्ट तणनाशक फवारणीचा फटका बसला असून, या सर्वांचे मिळून ५० पेक्षा अधिक एकर क्षेत्रातील पिक करपले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनतण नियंत्रणासाठी फवारणी केलेल्या औषधामुळे पिकेच करपल्याने आर्थिक नुकसान झालेल्या मंगरुळपीर आणि मानोरा तालुक्यातील १७ शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केली असून, या प्रकरणी संबंधित कृषीसेवा केंद्र आणि तणनाशक निर्मात्या कंपनीवर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी