शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

वादळवारा, अवकाळी पावसामुळे ५१० एकरातील पिकांचे नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 12:38 IST

जिल्ह्याच्या बहुतांश तालुक्‍यांत सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपिटही झाली.

वाशिम :  एकामागून एक कोसळणाऱ्या संकटापुढे शेतकरी पुरता गारद झाला असून, गत दोन दिवसांतील अवकाळी पाऊस, गारपिट व वादळवाऱ्यामुळे ५१० एकरातील ( २०४ हेक्टर) पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला. तातडीने पंचनामे करण्याचे निर्देशही जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणेला दिले.

जिल्ह्याच्या बहुतांश तालुक्‍यांत सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपिटही झाली. वादळवाऱ्याचा जोर प्रचंड असल्याने पपई, संत्रा यांसह अन्य फळबागेचे नुकसान झाले तसेच आंब्याचा मोहोरही गळून पडला. हवामान खात्याने ५ ते ७ मार्चदरम्यान जिल्ह्यात वादळवाऱ्यासह अवकाळी पावसाचे संकेत दिले होते. या संकेतानुसार सोमवारी सायंकाळी ग्रामीण भागात वादळवाऱ्यासह गारपिट, तुरळक पाऊस झाला. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण, वादळवारा आणि तुरळक पाऊस झाल्याने गारठा निर्माण झाला होता. अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा पिकाचे नुकसान झाले. वादळवाऱ्यामुळे संत्रा, पपई, लिंबू, आंब्याचेही प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर जणू आर्थिक संकटच कोसळले. हातातोंडाशी आलेला घास वादळवारा, गारपिट व अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली.

वादळवारा, अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे जिल्ह्यातील २०४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वीज पडून एका गोऱ्हाचा मृत्यू झाला. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना संबंधितांना दिलेल्या आहेत.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :Rainपाऊस