शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पिक नुकसान: पाच जिल्ह्यातील १५०८ शेतकऱ्यांची आर्थिक मदत प्रलंबितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 14:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यात एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ दरम्यान अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानापोटी शासनाने वर्षभरानंतर १० जुलै रोजी आर्थिक मदत मंजुर केली. अमरावती विभागातील १५०८ शेतकºयांचा या अंतर्गत समावेश करण्यात आला आहे; परंतु अद्याप या मदतीच्या वितरणासाठी निधी प्राप्त झाला नाही, अशी ...

ठळक मुद्देअतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे अमरावती विभागातील १५०८ शेतकºयांचे एकूण ७७८.६४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते.शासनाकडून ६७.२१ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य शासनाने १० जुलै रोजीच्या निर्णयाद्वारे मंजुरी दिली. परंतु २० दिवस उलटले तरी नुकसानग्रस्त शेतकºयांना ही मदत मिळू शकलेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्यात एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ दरम्यान अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानापोटी शासनाने वर्षभरानंतर १० जुलै रोजी आर्थिक मदत मंजुर केली. अमरावती विभागातील १५०८ शेतकºयांचा या अंतर्गत समावेश करण्यात आला आहे; परंतु अद्याप या मदतीच्या वितरणासाठी निधी प्राप्त झाला नाही, अशी माहिती वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातून रविवारी मिळाली.माहे एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे, फळपिकांचे मोठे नुकसान झाले. महसूल आणि कृषी विभागाच्यावतीने या नुकसानाची संयुक्त पाहणी करून शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला. या अहवालाच्या आधारे शासनाकडून प्रचलित दरानुसार नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत म्हणून १० जुलै रोजी रक्कमही मंजूर केली. प्रशासनाकडून शासनाकडे सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, अमरावती विभागातील १५०८ शेतकºयांचे एकूण ७७८.६४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील ११५८ शेतकºयांचे ६२४.६७ हेक्टर, यवतमाळ जिल्ह्यातील २५५ शेतकºयांचे ११५.६३ हेक्टर, बुलडाणा जिल्ह्यातील ७३ शेतकºयांचे २६.०४ हेक्टर अकोला जिल्ह्यातील २० शेतकºयांचे १०.७० हेक्टर आणि वाशिम जिल्ह्यातील २ शेतकºयांचे १.६० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. या पाचही जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत म्हणून शासनाकडून ६७.२१ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य शासनाने १० जुलै रोजीच्या निर्णयाद्वारे मंजुरी दिली. सदर मदतीचा खर्च विभागीय आयुक्त कार्यालयास पूर, चक्रीवादळ, पीक नुकसान, तसेच इतर नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी उपलब्ध तरतुदीतून करण्याचे निर्देशही शासनाने दिले; परंतु २० दिवस उलटले तरी नुकसानग्रस्त शेतकºयांना ही मदत मिळू शकलेली नाही.एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ या कालावधित अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानासाठी आर्थिक मदत शासनाकडून मंजूर झाली आहे; परंतु आर्थिक मदतीसाठी निधी उपलब्ध झाला नाही.- बाळासाहेब बोराडे,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी