शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील धुळीमुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 14:55 IST

वाशिम-मंगरुळपीरदरम्यान सुरू असलेल्या कामासाठी रस्ता समतलीकरणात माती मिश्रीत मुरुमाचा वापर होत असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडून ती पिकांवर बसत असल्याने रस्त्यालगतच्या शेतामधील पिके सुूकू लागली आहेत. 

दुचाकीधारकही त्रस्त: मातीमिश्रीत मुरुमाच्या वापराचा परिणामलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्यावतीने करण्यात असलेल्या रस्ता कामांमुळे पिकांचे नुकसान होत आहे. वाशिम-मंगरुळपीरदरम्यान सुरू असलेल्या कामासाठी रस्ता समतलीकरणात माती मिश्रीत मुरुमाचा वापर होत असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडून ती पिकांवर बसत असल्याने रस्त्यालगतच्या शेतामधील पिके सुूकू लागली आहेत. जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्यावतीने वाशिम-हिंगोली , वाशिम-यवतमाळ, महान आर्णी आणि मालेगाव-मेहकर या चार मार्गाचे काम करण्यात येत आहेत. सिमेंट काँक्रीटचे हे रस्ते चौपदरी करण्यात येत असून, या मार्गाचे कंत्राट परराज्यातील बड्या कंपन्यांना देण्यात आले आहे. दीड महिन्यापासून सुरू असलेल्या या रस्त्यांच्या कामासाठी प्राथमिक स्तरावर मुरूम या गौणखनिजाचा वापर करून समतलीकरण करण्यात येत आहे. तथापि, वापरण्यात येत असलेल्या या मुरुमात मातीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने ही माती वाहनांच्या वर्दळीमुळे उडून पिकांवर बसत आहे. यामुळे पाने धुळीने माखली जात असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. पाने हे झाडांसाठी प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्ननिर्मितीचे काम करतात; परंतु त्यावर धुळ बसत असल्याने पिके सुकत चालली आहेत. या प्रकारामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. सद्यस्थितीत रब्बी हंगामातील हरभरा, गहू पिकांची पेरणी झालेली असली तरी, वाशिम-मंगरुळपीर मार्गावरील शेतांत खरीपातील तुरीचे प्रमाणच अधिक असल्याने सर्वाधिक फटका याच पिकाला बसत आहे. दरम्यान, वाहनांमुळे उडणारी धुळ डोळ्यात जात असल्याने दुचाकीचालकांनाही याचा त्रास होत आहे.

टॅग्स :washimवाशिमroad transportरस्ते वाहतूकMangrulpirमंगरूळपीर