कारंजा लाड (वाशिम) : संगणमत करुन गैरकायदेशिर मंडळी जमवुन चिडवण्याच्या कारणावरुन झालेल्या मारहाण प्रकरणी दोन्ही गटाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी २३ जणाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १0 वाजता दरम्यान घडली. सविस्तर असे की येथील महात्मा फुले चौकात दोन्ही गटानी गैरकायदेशीर मंडळ जमवून चिडवण्याच्या कारणावरुन झालेल्या हाणामारीत मारहाण करुन जखमी गेले त्या प्रकरणी फियार्दी शहबाज खान, सरफराज खान रा.दारव्हा वेश यांच्या तक्रारीनुसार शरफोद्दीन, नियाजोद्दीन शरफोद्दीन, कालीमोद्दीन, जिायदिन , अफारुख अ.गफ्फार आली जब्बार अली , फातेमा बी, शिरोद्दीन जियाउद्दीन तसेच गटाने फिर्यादी नियाजोद्दीन जियाद्दीने रा.कागजीपुरा यांच्या तक्रारीनुसार आरोपी विरुद्ध रशिद खान, आमीर खान रशिद खन, रशिद खान चा मुलगा, सरफराज खान, शहबाज खान, नासीर पठाण, युसूफ पठान चा मुलगा साहेराबी रा.दारव्हा वेस या दोन्ही गटाच्या मंडळाविरुद्ध विविध कलमातर्गत गुन्हा दाखल पुढील तपास ठाणेदार राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारंजा पोलिस करीत आहे.
हाणामारीप्रकरणी २३ जणाविरुद्ध गुन्हे दाखल
By admin | Updated: February 27, 2015 00:58 IST