शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

म्हशीला विषारी औषध देऊन मारल्याप्रकरणी १२ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 16:01 IST

Washim Crime news विषारी औषध देऊन म्हशीला मारल्याचा पशूपालक दिनकर पंढरी यांचा आरोप आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील पोलीस स्टेशन शिरपूर अंतर्गत एकांबा येथे म्हशीच्या मृत्यूप्रकरणी पशूपालकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी १२ जणांंवर गुन्हा दाखल केला. विषारी औषध देऊन आरोपींनी म्हशीला मारल्याचा पशूपालक दिनकर पंढरी यांचा आरोप आहे.  एकांबा येथील दिनकर पंढरी गवळी यांच्याकडे तीन म्हशी होत्या.  ते यातील दोन म्हशी घरात, तर एक म्हैस घराबाहेर बांधून ठेवत होते. रविवार १ नोव्हेंबर रोजी तिन्ही म्हशी सकाळी सात वाजेपर्यंत तंदुरुस्त होत्या. दिनकर गवळी हे ८.३० वाजता म्हशी चराईला सोडण्यास जात असताना एका म्हशीच्या तोंडाला फेस आल्याचे दिसले. त्यांनी गावातील पशू डॉक्टरांना उपचारासाठी बोलावले; परंतु तू येईपर्यंत म्हशीचा मृत्यू झाला. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रमेश रंगराव गवळी, सुधीर रमेश गवळी, आकाश रमेश गवळी, संतोष माणिक गवळी,  ज्ञानेश्वर दामोदर गवळी, विठ्ठल दामोदर गवळी, बबन नारायण गवळी, देवराव नारायण गवळी, गोपाल बबन गवळी, शंकर बबन गवळी व दोन महिलांसह एकूण १२ जणांवर कलम ४२९  ३४ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हशी बांधण्यावरून झाला होता वाद दिनकर गवळी यांनी या प्रकरणी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा काही शेजाºयांशी १७ आॅक्टोबरला म्हशी बांधण्यावरून वाद झाला होता. त्यावेळी शेजाºयांनी एखाद्या दिवशी म्हशी  मारुन टाकू अशी धमकी त्यांना दिली होती. त्यामुळे आपली म्हैस शेजारच्या लोकांनीच विषारी औषध देऊन मारली असून, यात त्यांचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

टॅग्स :washimवाशिमShirpurशिरपूर