लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - आधारभूत किंमतीनुसार मूग व उडदाची खरेदी होण्यासाठी वाशिमला नाफेड केंद्र सुरू करण्याबाबत वरिष्ठांशी संपर्क साधावा अशी सूचना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांना २५ सप्टेंबर रोजी एका पत्राद्वारे केली आहे. यासंदर्भात वाशिम बाजार समितीचे संचालक राजू चौधरी यांनी १३ सप्टेंबरला जिल्हा उपनिबंधकांना निवेदन दिले होते.सन २०१७-१८ या हंगामातील मूग व उडीद बाजार समितीत विक्रीसाठी येत आहे. मूग पिकाला ५३७५ रुपये दर व २०० रुपये बोनस असा एकूण ५५७५ रुपये हमीभाव तर उडीद पिकाला ५२०० रुपये दर व २०० रुपये बोनस असा एकूण ५४०० रुपये हमीभाव जाहिर करण्यात आला आहे. त्यानुसार बाजार समितीत मूग व उडदाची खरेदी होणे अपेक्षीत आहे. मात्र, यापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकºयांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकºयांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाने वाशिम जिल्ह्यात आधारभूत किंमतीने उडीद व मूगाची खरेदी होण्यासाठी नाफेड केंद्र सुरू करावे, अशी मागणी वाशिम बाजार समितीचे संचालक राजू चौधरी यांनी १३ सप्टेंबर रोजी जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांच्याकडे केली होती. याची दखल घेत कटके यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांशी संपर्क साधून, २५ सप्टेंबर रोजी पत्रव्यवहार केला आहे. नाफेडमार्फत मूग व उडाचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत प्रधान कार्यालयाशी तत्काळ संपर्क साधावा, अशी सूचना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांना पत्राद्वारे केली आहे.
नाफेड केंद्र सुरू करण्यासंदर्भात पत्रव्यवहार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 19:25 IST
वाशिम - आधारभूत किंमतीनुसार मूग व उडदाची खरेदी होण्यासाठी वाशिमला नाफेड केंद्र सुरू करण्याबाबत वरिष्ठांशी संपर्क साधावा अशी सूचना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांना २५ सप्टेंबर रोजी एका पत्राद्वारे केली आहे. यासंदर्भात वाशिम बाजार समितीचे संचालक राजू चौधरी यांनी १३ सप्टेंबरला जिल्हा उपनिबंधकांना निवेदन दिले होते.
नाफेड केंद्र सुरू करण्यासंदर्भात पत्रव्यवहार !
ठळक मुद्देमूग, उडदाची खरेदी जिल्हा उपनिबंधकांचे मार्केटिंग अधिकाºयांना पत्र