शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Washim : प्रतिबंधित क्षेत्राबाहेरही होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 11:43 IST

जिल्हा प्रशासनाने आता प्रतिबंधित क्षेत्राबरोबरच प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील नागरिकांचीही आरोग्य सुरू केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्हा प्रशासनाने आता प्रतिबंधित क्षेत्राबरोबरच प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील नागरिकांचीही आरोग्य सुरू केली. घरोघरी केल्या जाणाऱ्या सर्वेतून अतिजोखमीचे नागरिक, गरोदर महिला, लहान बालकांचा शोध घेतला जाणार असून, त्यानुसार त्यांच्या तातडीने वैद्यकीय उपचार केले जाणार आहेत.कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे असलेल्या व्यक्तींचा शोध व अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यासाठी जिल्ह्यातील शहरी भागात नगरपालिका व आरोग्य विभागाच्या पथकाकडून घरोघरी जाऊन २१ जूनपासून आरोग्य तपासणी मोहिम सुरू केली. या पथकाला आपल्या आरोग्याविषयी तसेच अतिजोखमीच्या आजाराबद्दल अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले. कोरोना विषाणू संसर्गाचे लवकरात लवकर निदान होऊन योग्य उपचार झाल्यास रुग्ण बरा होण्याची शक्यता अधिक असते. कोरोना विषाणू संसर्गाची ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे ही प्रमुख लक्षणे आहेत. तसेच शरीरातील आॅक्सिजन पातळीही कमी होते. अशी लक्षणे असलेल्या नागरिकांची तपासणी होऊन लवकरात लवकर निदान व्हावे, योग्य उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभाग व नगरपालिका पथकामार्फत शहरी भागात घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली. या तपासणीमध्ये ताप तसेच पल्स आॅक्सीमीटरद्वारे शरीरातील आॅक्सिजनची पातळी तपासली जात आहे. आपल्या घरी येणाºया आरोग्य पथकाकडून कुटुंबातील सर्व व्यक्तींची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले.

अतिजोखमीच्या आजाराची अचूक माहिती द्या !मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब, क्षयरोग यासारखे अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्ग अधिक घातक असल्याचे दिसून येते. अशा व्यक्तींची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याने त्यांची माहिती सुद्धा आरोग्य तपासणी दरम्यान घेतली जात आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबात असे आजार असलेल्या व्यक्तींची अचूक माहिती आरोग्य कर्मचा?्यांना द्यावी. तसेच ६० वर्षांवरील व्यक्ती, गरोदर महिला यांचीही माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मोडक यांनी केले आहे.

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या