शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Washim : ‘कोविड केअर सेंटर’साठी स्थळांची चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 11:12 IST

‘कोविड केअर सेंटर’साठी स्थळांची चाचपणी सुरु झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग सज्ज झाला असून, बाधित रुग्णांवर उपचाराकरीता जिल्हास्तरावर ‘कोविड हॉस्पिटल’, ‘कोविड हेल्थ सेंटर’ची तयारी झाल्यानंतर आता तालुकास्तरावर ‘कोविड केअर सेंटर’साठी स्थळांची चाचपणी सुरु झाली आहे. जिल्ह्यातील सहाही तालुक्यात ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ईमारतीसह इतर शासकीय इमारतीत ही सुविधा कशी करता येईल, याचा विचार जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग महाराष्ट्रसह देशात झपाट्याने वाढत आहे. यावर नियंत्रणासाठी राज्यशासनाच्या निर्देशानुसार प्रशासन विविध उपाय योजना करीत आहे. त्यात संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाने तयारी केली असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कोरोना संसर्ग बाधित लोकांवर उपचार करण्यासाठी आयसोलेशन कक्ष उभारणे आवश्यक आहे. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात जिल्हास्तरावर जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘कोविड हॉस्पिटल’ अंतर्गत ५० खाटांची सुविधा करण्यात आली, तर नर्सिंग होस्टेलमध्ये ‘कोविड हेल्थ सेंटर’ अंतर्गत शंभर खाटांची तयारी झालेली आहे. आता तालुकास्तरावर ‘कोविड केअर सेंटर’ची तयारी करण्यात येत असून, यासाठी सहाही तालुक्यातील ग्र्रामीण रुग्णालये किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करण्यात येत आहे. सहा तालुक्यात प्रत्येक एक ‘कोविड केअर सेंटर’ ठेवण्यात येणार आहे. ही व्यवस्था करताना संबंधित ग्रामीण रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ईमारतीत बाह्यरुग्ण कक्षात येणाऱ्या रुग्णांचा किंवा इतरांचा कोविड केअर सेंटरशी संपर्क होणार नाही. याची दक्षता घेणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊनच आरोग्य विभाग ईमारतींची पाहणी करीत आहे.इमारतींची पाहणीकोविड केअर सेंटरसाठी तालुकास्तरावर कोणती शासकीय इमारत सुयोग्य राहिल, याची पाहणी आरोग्य विभाग तसेच जिल्हा प्रशासनाच्या चमूतर्फे केली जात आहे. सहाही तालुक्यात ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ईमारती सुजज्ज आहेतच; परंतू याव्यतिरिक्त अन्य शासकीय इमारतींचीदेखील चाचपणी सुरू आहे. सुरकंडी येथील अनु. जाती मुलींची शासकीय निवासी शाळेची या चमूने गुरूवारी पाहणी केली.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर संभाव्य स्थितीचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाचे नियोजन सुरू आहे. या अंतर्गत जिल्हास्तरावरील आयसोलेशन कक्ष वगळता तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर ठेवण्याची तयारी असून, यासाठी आरोग्य विभागाच्या अख्त्यारीत असलेल्या ईमारतींची पाहणी करण्यात येत आहे.- डॉ. अविनाश आहेर,जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या