शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Washim : दुसरा अहवाल निगेटिव्ह आलेल्या रुग्णाचा तिसरा अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 14:45 IST

दुसरा अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्यानंतर २४ तासानंतरचा तिसरा अहवाल मात्र ‘पॉझिटिव्ह’ आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील मेडशी (ता.मालेगाव) येथील ५९ वर्षीय एका कोरोनाबाधित रुग्णाचा १५ दिवसानंतरचा दुसरा अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्यानंतर २४ तासानंतरचा तिसरा अहवाल मात्र ‘पॉझिटिव्ह’ आला आहे. यामुळे जिल्ह्यात पुन्हा खळबळ उडाली असून २० आणि २१ व्या दिवशी संबंधित रुग्णाचे ‘थ्रोट स्वॅब’ पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध स्वरूपातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. दरम्यान, १ एप्रिल रोजी मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील एका ५९ वर्षीय इसमाला संदिग्ध म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. त्याचे ‘थ्रोट स्वॅब’ तपासणीसाठी नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात पाठविल्यानंतर, ३ एप्रिल रोजी संबंधित रुग्णाचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्याने मोठी खळबळ उडाली. संबंधित रुग्णावर १४ दिवस आरोग्य विभागाने विशेष लक्ष ठेवून १५ व्या दिवशी त्याचा ‘थ्रोट स्वॅब’ तपासणीसाठी पाठविण्यात आला. १७ एप्रिलला हा अहवाल निगेटिव्ह आला; मात्र पुढच्या २४ तासानंतर पाठविण्यात आलेल्या ‘थ्रोट स्वॅब’चा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.दरम्यान, २० आणि २१ व्या दिवशी सदर रुग्णाचा ‘थ्रोट स्वॅब’ पुन्हा नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम