शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

CoronaVirus In Washim : बाधित रुग्णांच्या ‘हाय रिस्क’ संपर्कातील १२ जणांचे नमुने निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 18:49 IST

सर्व लोकांचे ‘थ्रोट स्वॅब’ नमुने निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एकास कोरोनाचा संसर्ग झाल्याचे त्याच्या ‘थ्रोट स्वॅब’ तपासणी अहवालावरून स्पष्ट झाल्यानंतर आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २३ जणांना शुक्रवारी रात्रीच जिल्हा सामान्य रुग्णालयात कॉरंटिन कक्षात हलविले. त्यापैकी हाय  रिस्क संपर्कातील १२ जणांचे ‘थ्रोट स्वॅब’ ’हार्ड अ‍ॅण्ड फास्ट’ तत्त्वावर औरंगाबाद येथे तपासणीला पाठविले होते. त्याचा अहवाल रविवारी प्राप्त झाला असून, या सर्व लोकांचे ‘थ्रोट स्वॅब’ नमुने निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे, ही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी दिली. दोन आठवड्यांपूर्वी दिल्ली येथील संमेलनात सहभागी  मेडशी येथील  व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे शुक्रवारी प्राप्त झालेल्या त्याच्या थ्रोट स्वॅब तपासणी अहवालावरून स्पष्ट झाले. त्यामुळे आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनासह जिल्हाभरात खळबळ उडाली आणि खबरदारी म्हणून प्रशासनाने बाधित रुग्णाच्या हायरिस्क संपर्कातील त्याच्या कुटुंबियांसह १२ जणांना, तसेच लो रिस्क संपर्कातील ११ जणांना तातडीने विलगीकरण कक्षात दाखल केले. त्यापैकी हायरिस्क संपर्कातील  १२ जणांचे थ्रोट स्वॅब नमुने जिल्हा सामान्य रुग्णालयाने शुक्रवार ३ एप्रिल रोजी रात्रीच ’हार्ड अ‍ॅण्ड फास्ट’ तत्त्वावर तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठविले होते. या नमुन्यांच्या अहवालाकडे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागासह जिल्हाभरातील जनतेचे लक्ष लागले होते. अखेर या सर्व लोकांच्या नमुन्यांचा अहवाल रविवारी २ वाजताच्या सुमारास आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून, सर्वच नमुने निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस