शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Washim : आणखी चौघांचा मृत्यू; ८९ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 12:06 IST

मंगळवारी ३२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी चार जणांचा मृत्यू झाल्याची नोंद गुरूवार, १० सप्टेंबर रोजी  घेण्यात आली तर ८९  जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. आता  कोरोनाबाधितांची संख्या २४६९ वर पोहोचली आहे. दरम्यान मंगळवारी ३२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्या वाढीबरोबरच उपचारादरम्यान मृत्यू होणाºयांची संख्याही वाढत असल्याने जिल्हावासियांची चिंता अधिकच वाढली आहे. गुरूवारी एकूण चार मृत्यूची नोंद झाली असून, यामध्ये जिल्ह्यात एक तर जिल्ह्यातील रुग्ण; परंतू जिल्ह्याबाहेर उपचार घेणाºया तिघांचा समावेश आहे. नव्याने ८९ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे गुरूवारी निष्पन्न झाले. यामध्ये वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट परिसर १, पोलीस वसाहत परिसर २, चंडिकावेस परिसर ८, पोलीस स्टेशन परिसर १, पाटील धाबा जवळील २, काळे फाईल परिसर १, इनामदारपुरा परिसर १, सुदर्शन नगर परिसर २, महात्मा फुले चौक परिसर १, जांभरुण महाली येथील ३, शिरपुटी येथील ६, मंगरूळपीर शहरातील संताजी नगर येथील ४, सोनखास येथील १, शेगी येथील १, निंबी येथील १, जनुना येथील १, कासोळा येथील १, मोहरी येथील १, गोलवाडी येथील १, कारंजा लाड शहरातील रंगारीपुरा येथील १, शांतीनगर येथील २, माळीपुरा येथील १, गवळीपुरा येथील १, शिक्षक कॉलनी परिसर १, एम. जे. हायस्कूल परिसर १, बाबरे कॉलनी परिसर १, वाणीपुरा येथील १, मानोरा तालुक्यातील इंझोरी येथील ८ , रिसोड शहरातील ब्राह्मण गल्ली परिसर १, अनंत कॉलनी परिसर २, देशमुख गल्ली परिसर १, गुजरी चौक परिसर ३, मालेगाव चौक परिसर १, गीताई नगर येथील १, सराफा लाईन परिसर ४, पंचवटकर गल्ली परिसर १, गैबीपुरा येथील १, बेंदरवाडी परिसर १, निजामपूर येथील ३, सवड येथील ४, रिठद येथील २, देगाव येथील १, महागाव येथील ४, किनखेडा येथील २, केनवड येथील १ अशा ८९ जणांचा समावेश आहे.आता कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २४६९ झाली असून, यापैकी १६८३ जणांनी कोरोनावर मात केली तर ४९ जणांचा मृत्यू आणि एकाने आत्महत्या केली. आता ७३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

मुंगळा येथील एकाचा मृत्यू, जिल्ह्याबाहेर तीन मृत्यूजिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात उपचारादरम्यान रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे जिल्हावासियांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथील ६८ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद १० सप्टेंबरला घेण्यात आली तसेच जिल्ह्यातील रुग्ण; परंतू जिल्ह्याबाहेर उपचार घेणाºया तीन जणांचा मृत्यू झाल्याची नोंदही १० सप्टेंबरला करण्यात आली. आतापर्यंत एकूण ४९ मृत्यू झाले असून, एका रुग्णाने आत्महत्या केली.

३३ जणांना डिस्चार्जगुरूवारी एकूण ३२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.  यामध्ये वाशिम शहरातील इंदिरा चौक येथील १, लाखाळा येथील १, नवीन पोलीस वसाहत परिसर १, दंडे चौक परिसर २, देवपेठ येथील ६, फाळेगाव येथील १, घोटा येथील १, मालेगाव शहरातील २, डव्हा येथील २, ब्राह्मणवाडा येथील १, रिसोड शहरातील महानंदा कॉलनी परिसर १, शिवाजी नगर परिसर ५, देशमुख गल्ली परिसर ३, शहरातील इतर ठिकाणच्या १, खडकी सदार येथील १, येवती येथील १, मानोरा तालुक्यातील इंझोरी येथील १, रुईगोस्ता येथील १ अशा ३५ जणांचा समावेश आहे.

७३६ रुग्णांवर उपचार सुरूजिल्ह्यात आतापर्यंत २४६९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी १६८३ रुग्ण बरे झाले असून, त्यांना सुटी देण्यात आली. उर्वरीत ७३६ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरू आहेत.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या