शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Washim : एकाचा मृत्यू ; आणखी २८ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 11:24 IST

, ११ जुलै रोजी रात्रीदरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात शहरांसह ग्रामीण भागातही कोरोनाचा कहर सुरूच असून, रविवार १२ जुलै रोजी दिवसभरात एकूण २८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. आता एकूण रुग्णसंख्या २४५ झाली असून, यापैकी १३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, ११ जुलै रोजी रात्रीदरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला.जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी प्राप्त अहवालानुसार त्यात आणखी २८ जणांची भर पडली. दुपारी २ वाजता प्राप्त अहवालानुसार, वाशिम शहरातील सुंदरवाटिका परिसरातील एकाच कुटुंबातील चार जण, कामरगाव ता. कारंजा येथील दोन जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. सायंकाळी ६.३० वाजता प्राप्त अहवालानुसार एकूण २२ जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये रिसोड तालुक्यातील १४, मंगरूळपीर तालुक्यातील ६, कारंजा लाड व वाशिम तालुक्यातील प्रत्येकी १ व्यक्तीचा समावेश आहे. रिसोड येथील इंदिरा नगर परिसरातील १२, सदाशिव नगर परिसरातील १, आंचळ (ता. रिसोड) येथील १ तसेच मंगरूळपीर येथील मंगलधाम, बढाईपुरा, दर्गा चौक व हुडको कॉलनी परिसरातील प्रत्येकी १ असे एकूण चार, तसेच चिखली (ता. मंगरूळपीर) येथील ०२ व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. हे सर्वजण जिल्ह्यातील यापूर्वीच्या बाधितांच्या संपर्कातील आहेत. कारंजा तालुक्यातील रामनगर येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले असून सदर व्यक्ती यवतमाळ जिल्ह्यातील कोरोना बाधिताच्या संपर्कातील आहे. वाशिम शहरातील बागवानपुरा परिसरातील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. आता एकूण रुग्णसंख्या २४५ झाली असून, यापैकी १३४ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. आतापर्यंत १०५ जणांनी कोरोनावर मात केली.

वाशिम शहरातील एका रुग्णाचा मृत्यू७ जुलै रोजी कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या वाशिम शहरातील कुंभारपुरा येथील ६९ वर्षीय व्यक्तीचा ११ जुलै रोजी एमजीएम, औरंगाबाद येथे मृत्यू झाला आहे. सदर व्यक्तीला हृदयरोग असल्याने त्याची यापूर्वीच शस्त्रक्रिया होवून ‘पेसमेकर’ उपकरण बसविण्यात आले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्यावर हृदयरोगविषयक उपचार करणाऱ्या औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान ११ जुलै रोजी सदर व्यक्तीचा मृत्यू झाला.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या