शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Washim : ‘होम क्वारंटीन’ करण्यावरून उद्भवताहेत वाद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 11:51 IST

आमचे नाव का कळविले, आमच्या घरात बाहेरून कुणीही आले नाही. मग १४ दिवस क्वारंटीन का व्हावे, असे म्हणत ग्रामीण भागात वाद निर्माण होत असल्याचे दिसून येते.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : परराज्यातून किंवा रेडझोनमधून येणाऱ्या विद्यार्थी, कामगार , मजूरांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून तालुकास्तरावर विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले.मात्र संबंधितांना या ठिकाणी क्वारंटीन व्हा, असे म्हणणे ग्रामीण भागात भांडणाचे मूळ ठरत असल्याचे मालेगाव व रेगाव येथील २०, २१ मे च्या घटनेवरून दिसून येते.परराज्यातून तथा मुंबई, पुणे, नागपूर आदी शहरातून गावी परतण्यासाठी अडकलेल्या नागरिकांना शासनाकडून काही अटीवर परवानगी देण्यात आली. त्यानुसार येथून मोठ्या प्रमाणात मजूर, विद्यार्थी, कामगार आदींची घरवापसी सुरु आहे. गावात कोरोनाचा संसर्ग होवू नये , यासाठी प्रशासनाकडून गावपातळीवर कोरोना सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली. मात्र रात्री- बेरात्री लपूनछपून आलेले अनेकजण घरातच बसून राहतात. संबंधित व्यक्तीची माहिती शेजारील नागरिक प्रशासनाला देण्याचा प्रयत्न करते. परंतु, आमचे नाव का कळविले, आमच्या घरात बाहेरून कुणीही आले नाही.मग १४ दिवस क्वारंटीन का व्हावे, असे म्हणत ग्रामीण भागात वाद निर्माण होत असल्याचे दिसून येते. रेगाव आणि मालेगाव येथे वाद निर्माण झाला होता. मालेगावचे पोलीस वेळेवर पोहचवले आणि वाद मिटविले. काही ठिकाणी वाद निर्माण झाला तर तालुका प्रशासनाला जावून गावकº्यांची समजूत काढावी लागते. आतापर्यंत सात ते आठ ठिकाणी जावे लागले. गावात बाहेरगाववरून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यांची तपासणी करून क्वारंटीन करणे आवश्यक ठरत आहे. हातावर ‘होम क्वारंटीन’चे शिक्केमालेगाव तालुक्यात परराज्य, परजिल्ह्यातून अनेक मजूर, कामगार, युवक परतत आहेत. या सर्वांच्या हातावर ‘होम क्वारंटीन’चे शिक्के मारले जात आहेत. १४ दिवस घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या.परराज्यातून किंवा बाहेर जिल्ह्यातून येणाºयांनी स्वत:च माहिती प्रशासनाकडे द्यावी. असे न करता घरात लपून राहिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.- आधारसिंग सोनोने,पोलीस निरीक्षक, मालेगाव

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम