शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Washim : आणखी सहाकोरोना पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या १२४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 11:26 IST

आता एकूण रुग्णसंख्या १२४ झाली असून, यापैकी ३७ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत.

वाशिम : शनिवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात आणखी चार जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर ५ जुलैला भापूर (ता.रिसोड) येथील एक महिला पॉझिटिव्ह निघाली. वाशिम शहरातील एक जण अकोला येथे पॉझिटिव्ह आला. आता एकूण रुग्णसंख्या १२४ झाली असून, यापैकी ३७ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत.जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे एप्रिल महिन्यात आढळला होता. मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. जून महिन्याच्या अखेरीस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शतकाच्या उंबरठ्यावर होती. १ जुलै रोजी कोरोनाबाधित रुग्णसंख्येने शतक ओलांडले. जुलै महिन्यातही कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. शनिवार, ४ जुलै रोजी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ जण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये 'आयएलआय'ची लक्षणे असलेले मालेगाव येथील २६ व ३४ वर्षीय पुरुष, नागपूर येथे कोरोनाबाधित आढळलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील मंगरुळपीर येथील २९ वर्षीय पुरुष आणि औरंगाबाद येथून हराळ (ता. रिसोड) येथे परतलेल्या २५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. वाशिम शहरातील हकीम अली नगर येथील एक व्यक्ती अकोला येथे कोरोनाबाधित आढळून आला. ५ जुलैला रात्री ९ वाजता प्राप्त अहवालानुसार भापूर (ता. रिसोड) येथील ६५ वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. आता एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या १२४ झाली असून, यामध्ये ३७ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. १२४ रुग्णांमध्ये जिल्ह्यातील ११०, तर वाशिम जिल्ह्यातील रहिवासी; परंतु परजिल्ह्यात उपचार घेणाऱ्या १४ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात २८ तर जिल्ह्याबाहेर आठ अशा एकूण ३७ जणांवर उपचार सुरू आहेत. ५ जुलै रोजी वाशिम येथील एका रुग्णाने कोरोनावर मात केली. आतापर्यंत ८४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मंगरूळपीरकरांची चिंता वाढली जुलै रोजी रात्री उशिरा प्राप्त अहवालावरून मंगरूळपीर शहरातील एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. सदर व्यक्ती ही डॉक्टर असून बाधित व्यक्तींच्या संपर्कात अजून कोणते रुग्ण व नागरिक आले, याचा शोध प्रशासन घेत आहे. आता शहरात कोरोनाबाधितांची संख्या सहा झाली आहे. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. डॉक्टरांच्या संपर्कात किती जण आले याची निश्चित माहिती ६ जुलैपर्यंत प्रशासनाच्या हाती येणार आहे.

४ जुलै रोजी रात्री उशिरा चार जण पॉझिटिव्ह तर ५ जुलै रोजी वाशिम शहरातील एक जण अकोला येथे पॉझिटिव्ह आला आहे. ५ जुलै रोजी वाशिम शहरातील एका रुग्णाने कोरोनावर मात केल्याने त्याला सुटी देण्यात आली आहे. उर्वरीत रुग्णांवर उपचार सुरू आहे.- डॉ. अंबादास सोनटक्केजिल्हा शल्य चिकित्सक

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम