शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Washim : आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या १२ वर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 11:21 IST

बोराळा हिस्से येथील २५ वर्षीय युवकाला कोरोना संसर्ग झाल्याचे ६ जून रोजी सायंकाळी स्पष्ट झाल्याने आता रुग्णसंख्या १२ वर पोहचली. आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम तालुक्यातील बोराळा हिस्से येथील २५ वर्षीय युवकाला कोरोना संसर्ग झाल्याचे ६ जून रोजी सायंकाळी स्पष्ट झाल्याने आता रुग्णसंख्या १२ वर पोहचली. आहे. यापैकी दोघांचा मृत्यू तर सहा जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना यापूर्वीच रुग्णालयातून सुटी देण्यात आली. उर्वरीत चार जणांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील भोयणी, दादगाव येथील प्रत्येकी एक अशा दोन कोरोनाबाधित रुग्णाच्या ‘हाय-रिस्क’ संपर्कातील ३९ सह ६१ संदिग्ध रुग्णांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी अकोला पाठविले होते. यापैकी ५६ अहवाल ६ जून रोजी निगेटिव्ह आले. यामध्ये भोयणी व कार्ली येथील अहवालांचा समावेश आहे. दुसरीकडे अजून २७ अहवाल प्रलंबित असल्याने थोडी धाकधूकही कायम आहे.बोराळा हिस्से येथील २५ वर्षीय युवकाला कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने पाच दिवसांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले होते. त्याचा थ्रोट स्वॅब अहवाल ६ जून रोजी पॉझिटिव्ह आल्याने, त्याच्या कुटुंबातील चार जणांना ‘क्वारंटीन’ करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी दिली. दरम्यान, नवी मुंबई येथून मानोरा तालुक्यातील भोयणी येथे परतलेल्या कोरोनाबाधित महिलेच्या ‘हाय-रिस्क’ संपर्कात भोयणी येथे १८ तसेच कार्ली येथील तीन असे एकूण २१ जण आले होते. या सर्वांच्या थ्रोट स्वॅब नमुन्याचा अहवाल ६ जून रोजी निगेटिव्ह आला.

बोराळा हिस्से गाव सीलबोराळा हिस्से ता. वाशिम येथे कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने ६ जून रोजी सायंकाळी तालुका प्रशासनाची चमू दाखल झाली असून, गाव सील करण्याची कार्यवाही सुरू केली. हा रुग्ण नेमका कुठून आला किंवा कुणाच्या संपर्कात आला होता, याची माहिती आरोग्य विभाग व वाशिम तालुका प्रशासन घेत आहे.६ जून रोजी सुरूवातीला ५६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यानंतर सायंकाळी बोराळा हिस्से येथील एका युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या युवकाच्या कुटुंबातील सदस्यांना क्वारंटीन केले. हा युवक नेमका कुठून आला, कोणत्या रुग्णाच्या संपर्कात आला होता का याची माहिती घेतली जात आहे.- डॉ. अंबादास सोनटक्केजिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या