शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Washim : आणखी ४२ रुग्ण वाढले; ५० कोरोनामुक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 11:21 IST

मंगळवार, ११ आॅगस्ट रोजी जिल्हाभरात एकूण ४२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ९९८ वर पोहोचली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, या संसर्गजन्य आजाराची नव्याने लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवार, ११ आॅगस्ट रोजी जिल्हाभरात एकूण ४२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ९९८ वर पोहोचली आहे. दरम्यान, मंगळवारी ५० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.आॅगस्ट महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, यामध्ये आणखी ४२ रुग्णांची भर पडली. कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताणही आपसूकच वाढला आहे. सकाळच्या अहवालानुसार, एकूण २७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये मंगरूळपीर शहरातील बालाजी मंदिर परिसरातील ३, कवठळ येथील ७, शेगी येथील ७, कारंजा लाड तालुक्यातील आखतवाडा येथील २, रिसोड शहरातील जिजाऊ नगर येथील १, एकलासपूर येथील ४, वाशिम शहरातील काळे फाईल येथील २, पार्डी आसरा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. सायंकाळी ७ वाजता प्राप्त अहवालानुसार १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रिसोड शहरातील जिजाऊ नगर परिसरातील २, मंगरूळपीर शहरातील जैन मंदिर परिसरातील १, शेगी येथील ४, वाशिम शहरातील गणेशपेठ येथील १, झाकलवाडी येथील १, पांडव उमरा येथील १, मालेगाव तालुक्यातील शिरसाळा येथील २, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील १, सोहळ येथील १, आखतवाडा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ९९८ झाली.

५० जणांना डिस्चार्जमंगळवारी ५० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. वाशिम शहरातील सप्तशृंगी नगर २, ड्रीमलँड सिटी परिसर २, गवळीपुरा येथील १, मंगरूळपीर शहरातील अकोला रोड परिसर १, जांब येथील १, मालेगाव तालुक्यातील काळा कामठा/पिंपळदरा येथील १, रिसोड शहरातील जुनी सराफा लाईन येथील ५, गणेशनगर येथील २, ब्राह्मण गल्ली येथील १, पठाणपुरा येथील १, कायंदे सदन परिसर १, हराळ येथील ४, भोकरखेड येथील २, कारंजा लाड शहरातील हातोतीपुरा येथील ७, भारतीपुरा येथील २, मजीदपुरा येथील ६, सिंधी कॅम्प येथील १, संतोषी माता कॉलनी परिसर ३, रामा सावजी चौक परिसर २, कानडीपुरा येथील १, रविदासनगर १, भामदेवी येथील ३ अशा एकूण ५० व्यक्तींचा समावेश आहे.

३५१ जणांवर उपचार सुरूजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९९८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ६२८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू तर एका रुग्णाने आत्महत्या केली. सद्यस्थितीत ३५१ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या