शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Washim : १७ निगेटिव्ह; तिघांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 11:17 IST

१७ जणांचे थ्रोट स्वॅब नमुने निगेटिव्ह आले असून, तिघांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सोमवार, २९ जून रोजी प्राप्त १७ जणांचे थ्रोट स्वॅब नमुने निगेटिव्ह आले असून, तिघांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दरम्यान, ८१ जणांच्या थ्रोट स्वॅब नमुन्याचे अहवाल प्रतिक्षेत असल्याने थोडीफार धाकधूकही कायम आहे.जून महिन्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ झाली असतानाच, दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात एकूण ९६ कोरोनाबाधित रुग्ण असून, यापैकी दोघांचा मृत्यू तर ६७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. उर्वरीत २७ जणांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू असून, आता सर्दी, ताप, खोकला, सारी आदी लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांचेदेखील स्वॅब घेण्यात येत आहेत. २७, २८ जून रोजी जवळपास ९८ स्वॅब पाठविण्यात आले होते. २९ जून रोजी १७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ८१ जणांच्या अहवालाची प्रतिक्षा कायम आहे. दरम्यान, २९ जून रोजीदेखील तीन जणांनी कोरोनावर मात केली असून, आता २७ जण अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.परराज्य, परजिल्हयातून आलेल्या नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने शहरी भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी मोहिम २१ जूनपासून हाती घेतली आहे. पहिल्या टप्प्यात वाशिम व कारंजा शहरातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत असून, आतापर्यंत जवळपास ७४ हजारावर नागरिकांची तपासणी झाली आहे. वयोवृद्ध नागरीक, गरोदर स्त्रिया, अतिजोखमीच्या गटातील नागरिकांवर आरोग्य विभागाचा विशेष वॉच असून, बाहेरगावावरून जिल्ह्यात परतणाºया प्रत्येक नागरिकाने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून तपासणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या