शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Washim : १६ निगेटिव्ह, सात जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 16:20 IST

३० जून रोजी प्राप्त १६ जणांचे थ्रोट स्वॅब नमुने निगेटिव्ह आले असून, सात जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ३० जून रोजी प्राप्त १६ जणांचे थ्रोट स्वॅब नमुने निगेटिव्ह आले असून, सात जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दरम्यान, ६५ जणांच्या थ्रोट स्वॅब नमुन्याचे अहवाल प्रतिक्षेत असल्याने थोडीफार धाकधूकही कायम आहे.परराज्य, परजिल्ह्यातून परतलेल्या नागरिकांमुळे जिल्हयात जून महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली. दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याचे आशादायी चित्र दिसून येते. जिल्ह्यात एकूण ९६ कोरोनाबाधित रुग्ण असून, यापैकी दोघांचा मृत्यू तर ७४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. उर्वरीत २० जणांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. २८ व २९ जून रोजी जवळपास ८१ स्वॅब पाठविण्यात आले होते. ३० जून रोजी १६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ६५ जणांच्या अहवालाची प्रतिक्षा कायम आहे. दरम्यान, ३० जून रोजीदेखील सात जणांनी कोरोनावर मात केली असून, आता २० जण अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने वाशिम व कारंजा शहरातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी व शरीरातील आॅक्सिजन पातळी तपासणी मोहिम २१ जूनपासून सुरू केलेली आहे. या मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन सर्वेक्षणही करण्यात येत आहे. शहरातील प्रत्येक नागरिकांच्या घरी जावून घरात असलेल्या संपूर्ण कुटुंबाची नोंद करुन तपासणी केल्या जात असून नागरिकांचे टेम्परेझर, प्लस यासह आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे. शरीराचे तापमान जास्त आढळल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधल्या जात आहे. या मोहीमेस नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्यावतिने करण्यात येत आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या