शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Washim : आणखी १० कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ९४५ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 13:01 IST

आणखी १० रुग्णाची भर पडल्याचे १० आॅगस्ट रोजी निदर्शनात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, यामध्ये आणखी १० रुग्णाची भर पडल्याचे १० आॅगस्ट रोजी निदर्शनात आले. आता जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ९४५ झाली असून, यापैकी ४०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वाशिम व कारंजा शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याने शहरवासियांची चिंता वाढली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच चेहऱ्यावर मास्क किंवा रुमालचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.आॅगस्ट महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक झपाट्याने वाढत असून, यामध्ये आणखी १० रुग्णांची भर १० आॅगस्ट रोजी पडली. सलग १० दिवसात ३५१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून येणे हा आतापर्यंतच सर्वाधिक उच्चांक आहे. आता कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ९४५ वर पोहोचली असून यापैकी ४०५ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. मे महिन्यापर्यंत जिल्हयात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या नियंत्रित होती. जून व जुलै महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आॅगस्ट महिन्यात जास्त संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताणही आपसूकच वाढला आहे. १० आॅगस्ट रोजी वाशिम शहरातील दंडे चौक येथील १, देगाव येथील २, अनसिंग येथील १, कारंजा लाड शहरातील माळीपुरा येथील १, सुंदरवाटिका परिसरातील १, सोहोळ येथील ४ असे एकूण १० जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू तर एका रुग्णाने आत्महत्या केली.

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या