शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : ‘थ्रोट स्वॅब’चे अहवाल मिळण्यास विलंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 11:05 IST

तीन जिल्हे मिळून अकोला येथे एकमेव ‘व्हीआरडीएल लॅब’ असल्याने अहवाल प्राप्त होण्यास विलंब लागत आहे.

- सुनील काकडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या धास्तीने ‘रेड झोन’ जिल्हे, महानगरे आणि परराज्यातील ६६ हजारांपेक्षा अधिक मजूर, कामगार २५ मे पर्यंत जिल्ह्यात परतले आहेत. त्यांच्यापैकी अनेकांमध्ये सदी, खोकला, ताप यासारखी लक्षणे आढळत असल्याने ‘थ्रोट स्वॅब’ घेऊन तपासणीसाठी पाठविण्याचे प्रमाण वाढले आहे; मात्र तीन जिल्हे मिळून अकोला येथे एकमेव ‘व्हीआरडीएल लॅब’ असल्याने अहवाल प्राप्त होण्यास विलंब लागत आहे. परिणामी, संदिग्ध रुग्ण, रुग्णालयीन कर्मचारी व गावकऱ्यांचा जीव टांगणीला लागत आहे.अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यांमधील संदिग्ध रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे (थ्रोट स्वॅब) नमुने तपासण्यासाठी अकोला येथे प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली. दरम्यान, बुलडाणा येथे आजमितीस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४७ असून अकोला जिल्ह्यात कोरोनाबाधीतांचा आकडा तब्बल ४२८ वर पोहचला आहे. याच जिल्ह्यातून संदिग्ध रुग्णांच्या ‘थ्रोट स्वॅब’ तपासणीचे दैनंदिन प्रमाणही कितीतरी पटीने अधिक आहे. परिणामी, वाशिम जिल्ह्यातून पाठविल्या जाणारे घशातील स्त्रावांचे नमुने ‘पॉझिटिव्ह‘ की ‘निगेटिव्ह’, हे कळण्यासाठी ४ ते ५ दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. यादरम्यान जिल्ह्यातील ‘कोव्हीड केअर सेंटर’ किंवा वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या संदिग्ध रुग्णासोबतच त्याच्यावर उपचार करणारे रुग्णालयातील कर्मचारी, गावकरी आणि संपर्कात आलेल्या सर्वांचाच जीव टांगणीला लागत आहे. ही बाब लक्षात घेता अकोला येथील प्रयोगशाळेत ‘स्वॅब’ नमुने तपासणीची गती वाढवून अहवाल लवकरात लवकर देण्यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न करावे, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.

२३ मे रोजी पाठविलेल्या घशातील स्त्रावांचे अहवाल अद्याप प्रलंबितप्रयोगशाळेकडे पाठविल्या जाणाºया घशातील स्त्रावांच्या नमुन्यांचे अहवाल नियमानुसार २४ तासांत प्राप्त होणे बंधनकारक आहे; मात्र हे अहवाल ९० तासानंतरही प्राप्त होत नसल्याची बिकट स्थिती उद्भवली आहे. वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातून २३ मे रोजी पाठविलेल्या ८ नमुन्यांचे अहवाल २६ मे पर्यंतही प्राप्त झालेले नव्हते.प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणाºया घशातील स्त्रावाच्या नमुन्यांचा अहवाल साधारणत: २४ तासात प्राप्त होणे आवश्यक आहे; मात्र चार ते पाच दिवस अहवाल प्राप्त होत नाही. तीन जिल्ह्यांसाठी अकोला येथेच एकमेव प्रयोगशाळा असल्याने तथा अकोल्यात अधिक रुग्ण असल्यामुळे हा प्रश्न उद्भवला आहे. यामुळे मात्र वाशिमची आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे.- डॉ. अंबादास सोनटक्केजिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम