शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : संदिग्ध रुग्णांमुळे जिल्हावासियांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 16:33 IST

संदिग्ध रुग्ण व परजिल्हयातून जिल्हयात येत असलेल्या नागरिकांमुळे  जिल्हावासियांची चिंता वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम जिल्हयाचा ग्रीन झोनमध्ये समावेश असला तरी परजिल्हयातून आलेले वाशिम रुग्णालयात भरती झालेल्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण, दिवसेंदिवस वाढत असलेले संदिग्ध रुग्ण व परजिल्हयातून जिल्हयात येत असलेल्या नागरिकांमुळे  जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. याकरिता विशेष खबरदारी नागरिकांना घ्यावी लागणार असून प्रशासन कौतूकास्पद काम करीत आहे यात तिळमात्र शंका नाही.वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गास रोखण्यात प्रशासकीय यंत्रणेला बहुतांशी यश आले आहे. जिल्हयातील मालेगाव तालुक्यातील एकमेव कोराना बाधित रुग्ण व नुकताच वर्धा येथे आढळलेला मंगरुळपीर तालुकयातील रुग्ण वगळता जिल्हयातील नागरिकांना कोरोना विषाणुची लागण झालेली नाही. मालेगाव तालुक्यातील रुग्ण बरा होउन घरी गेला असून मंगरुळपीर तालुक्यातील रुग्ण वर्धा येथे उपाचर घेत आहे. याव्यतिरिक्त वाशिम जिल्हयात उत्तरप्रदेशमधील एका ट्रकचा क्लिनर ज्याचा कोरोना पॉझिटीव्ह असतांना मृत्यू झाला व त्याच्या संपर्कातील ट्रकचालक जो उपचार घेत आहेत . परंतु प्रशासनाच्यावतिने विशेष खबरदारी घेतल्या जात असल्याने जिल्हा ग्रीन झोनमध्ये दिसून येत असला तरी शहरातील दररोज वाढती गर्दी पाहता नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे अन्यथा ग्रीन झोनमधून वाशिम जिल्हा रेडझोनमध्ये यायला वेळ लागणार नसल्याची चर्चा होत आहे.जिल्हयात दररोज चिंता वाढविणाºया व दिलासा देणाºया बातम्या झळकत आहेत. कारंजातील एका कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या १३ जणांचे थ्रोट स्वॅब नमुने पाठविल्यानंतर जिल्हावासियांची चिंता वाढली होती परंतु सर्वाचे अहवाल निगेटीव्ह आल्याने दिलासा मिळाला. आता मंगरुळपीर तालुक्यातील रुग्ण पॉझिटीव्ह आल्याने या तालुकयाची चिंता वाढली आहे. यांच्या संपर्कातील सात जणांना आयसोलेशन कक्षात दाखल केले असून संपूर्ण गावाची तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे. यांचा अहवाल येईपर्यंत जिल्हयावर टांगती तलवार आहे असे म्हटल्यास वावगे ठरु नये. यासोबतच रिसोड तालुकयातील पंचाबा येथील संदिग्ध रुग्णास दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. यासोबतच जिल्हयात दररोज शेकडो मजुर दाखल होत असल्याने जिल्हावासियांची चिंता वाढलेली दिसून येत आहे.

- परजिल्हयात अडकलेल्या नागरिकांची तपासणी करुन घ्यावी!वाशिम जिल्हयातील काही मजूर, नागरिक इतर जिल्हयात अडकलेल्या नागरिकांना जिल्हयात येण्याकरिता सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याने अनेक मजूर, नागरिक जिल्हयात दाखल होत आहेत. ते जिल्हयात दाखल झाल्याबरोबर त्यांची तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. परंतु परस्पर तपासणी न करता कोणी येत असेल तर नागरिकांनी प्रशासनास कळविणे गरजेचे आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या