शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात १६३ जणांची रॅपिड अँटीजन टेस्ट; ११ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 10:54 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्ह्यात झपाट्याने होणारा कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आता चाचण्यांचा वेगही वाढविला जात आहे. त्या अनुषंगाने ...

  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात झपाट्याने होणारा कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आता चाचण्यांचा वेगही वाढविला जात आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात ८ जुलैपासून कंटेनमेन्ट झोनमध्ये संदिग्ध रुग्णांची रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्ट केली जात असून, दोन दिवसात १६३ जणांचे नमुने तपासण्यात आले. यापैकी ११ नमुने पॉझिटिव्ह तर उर्वरीत १५२ निगेटिव्ह असल्याचे निदर्शनात आले. दुसरीकडे जिल्ह्यात २५०० ‘रॅपिड टेस्ट किट’ उपलब्ध झाल्या असून, पहिल्या टप्प्यात वाशिम, मंगरूळपीर व मालेगाव येथील कंटेनमेन्ट झोनमध्ये कोरोनाच्या रॅपिड टेस्टला सुरुवात करण्यात आली.सध्या कोविड रुग्णांच्या चाचणीसाठी अचूकता व एकाच वेळी चार ते पाच तासांच्या कालावधीत ९० नमुने तपासणीची क्षमता असणाऱ्या ‘रिअल टाइम- आरटीपीसीआर’ या प्रणालीचा उपयोग केला जातो. ही चाचणी उत्तम असली, तरी वाढत्या रुग्णसंख्येचा वेग पाहता आणखी जलद गतीने तपासण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी राज्य शासनाने ‘रॅपिड अ‍ॅन्टीजन बेस्ड’ तत्त्वावर आधारित चाचणी प्रणालीला मान्यता दिल्याने आता थेट कंटेनमेन्ट झोनमध्येच संदिग्ध रुग्णांची कोरोना चाचणी केली जात आहे. जिल्ह्याला २,५०० ‘रॅपिड अ‍ॅन्टीजन बेस्ड’ किट उपलब्ध झाल्या असून, त्या माध्यमातून वाशिम, मंगरूळपीर व मालेगाव तालुक्यातील कंटेनमेन्ट झोनमधून रॅपिड टेस्टिंगला सुरुवात करण्यात आली. ८ व ९ जुलै रोजी एकूण १६३ जणांचे नमुने तपासण्यात आले. यापैकी ११ जण पॉझिटिव्ह तर उर्वरीत १५२ जण निगेटिव्ह असल्याचे निदर्शनात आले.अशी होते, रॅपिड टेस्टया चाचणीत संदिग्ध व्यक्तीच्या नाकाच्या आतील स्त्राव घेतला जातो. हा स्त्राव व्हिटीएम (श््र१ं’ ळ१ंल्ल२ाी१ टी्िरं) द्रावणात मिसळला जातो. या द्रावणाचे किटच्या टेस्ट पट्टीच्या एका टोकाला टाकला जातो. या पट्टीच्या दुसºया टोकाला एक बारीक गुलाबी रेघ असते. सुमारे २५ ते ३० मिनिटात स्त्राव मिश्रीत द्रावण हे पट्टीच्या वरच्या भागापर्यंत पोहोचते. तर तेथे आणखी एक गुलाबी रेघ तयार झाली तर स्त्राव नमुना पॉझिटिव्ह आहे, असे समजले जाते, असे डॉ. अंबादास सोनटक्के यांनी सांगितले.

जिल्ह्याला २५०० रॅपिड टेस्ट किट उपलब्ध झाल्या आहेत. त्यानुसार वाशिम, मालेगाव व मंगरूळपीर येथील कंटेनमेन्ट झोनमधून तपासणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. यामुळे कोरोना चाचणीचा वेग वाढविण्यास मदत होईल.- डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम