शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कारंजात तपासणी करून गेलेला रुग्ण कोरोना ‘पॉझिटीव्ह’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 14:08 IST

संपर्कातील एका डॉक्टरसह ८ जण वाशिम येथे तपासणीला पाठविण्यात आले आहेत. 

लोकमत न्युज नेटवर्क कारंजा (वाशिम): यवतमाळ जिल्ह्याच्या नेर तालुक्यातील मधूमेह आजाराने ग्रस्त असलेला रुग्ण ४ मे रोजी कारंजातील एका खासगी रुग्णालयात नियमित तपासणी करून गेला. आता या रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे ६ मे रोजी त्याच्या थ्रोट स्वॅब तपासणी अहवालावरून स्पष्ट झाले. त्यामुळे या रुग्णाची तपासणी करणाºया एका डॉक्टरसह रुग्णालयातील तसेच लॅब व सोनोग्राफी सेंटरमधील मिळून ८ जणांना तातडीने वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्वांचे थ्रोट स्वॅब अहवाल तातडीने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यवतमाळ जिल्ह्याच्या नेर तालुक्यातील मधूमेह आजाराने ग्रस्त असलेला रुग्ण ४ मे रोजी कारंजा येथे आपल्या नियमित तपासणीसाठी आला होता. या रुग्णाची तपासणी संबंधित डॉक्टर आणि त्याच्या सहकाºयांनी केली.  या रुग्णाला श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयातून त्याचा थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला. या थ्रोट स्वॅबचा अहवाल ६ मे रोजी प्राप्त झाला. त्यात संबंधित रुग्णाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. कारंजात या रुग्णाची तपासणी करणाºया संबंधित डॉक्टरसह त्याची पत्नी व रुग्णालयातील २ सहकारी, एक रक्त तपासणी प्रयोशाळा तंत्रज्ञ १ व त्याचा सहकारी, एक सोनोग्राफी तंत्रज्ञ असे ८ जण त्या रुग्णाच्या संपर्कात आले असल्याने या सर्वांना तातडीने वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. या सर्वांचे थ्रोट स्वॅब अहवाल तातडीने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात ४ मे रोजी आणखी किती व्यक्ती आले. याबाबत  आरोग्य, महसुल व पोलीस विभागाकडून शोध घेण्यात येत आहे. मात्र तो रुग्ण कारंजातील कोणाच्याच संपर्कात आला नसल्याची माहिती ठाणेदार सतीश पाटील यांनी दिली.

नेर परसोपंत येथील तो रुग्ण आजाराच्या नियमित तपासणीसाठी आमच्या रुग्णालयात ४ मे रोजी आला. त्याच्या तपासणी दरम्यान लक्षणे आढळून आल्यामुळे त्याला दाखल न करता यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्या ठिकाणी तो खाजगी रुग्णालयात गेला मात्र त्या खाजगी डॉक्टरांचा फोन आल्यामुळे त्यांना मी सतर्क. त्यानंतर तो शासकीय रुग्णालयात गेला. त्याचा थ्रोट स्वॅब अहवाल पॉझिटीव्ह असल्याचे कळताच आम्ही ८ जण वाशिमला तपासणीसाठी आलो. आता आमचे रुग्णालय १४ दिवस बंद राहणार आहे. - डॉ.अजय कांत एमडी (मेडिसीन) कारंजा  ग्रामीण पोलिसांच्या ‘चेकपोस्ट’ वर प्रश्नचिन्हकोरोना विषाणू नियंत्रणासाठी जिल्हाप्रशासनाने जिल्हा बंदी केली असतानाही यवतमाळ येथील रुग्णाला ग्रामीण पोलिसांनी चेकपोस्टवरून कारंजा तालुक्यात प्रवेश दिला. त्यामुळे तालुक्यात कोरोना संसर्गाची भीती वाढली आहे. यवतमाळ जिल्ह्यातून नेर तालुक्यातून येणाºया नागरिकांना ‘चेकपोस्ट’वर चौकशी न करताच कारंजा तालुक्यात सोडल्याबद्दल संबंधित चेकपोस्टवरील कर्मचारी व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांवर कारवाईची मागणी होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKaranjaकारंजाwashimवाशिम