शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : ‘त्या’कोरोनाबाधित रुग्णामुळे कामरगावात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 10:51 IST

२ नागरिक व ३ शिक्षक अशा पाच जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा / कामरगाव : अमरावती येथील रहिवासी तथा कामरगाव येथील एका शाळेत कार्यरत शिक्षक कोरोनाबाधीत असल्याचे २५ एप्रिल रोजी निष्पन्न झाले. सदर इसमाच्या हस्ते २ एप्रिल रोजी कामरगावात शालेय पोषण आहाराचे वितरण झाले. त्यामुळे संपर्कात आलेल्या २०० जणांची २६ एप्रिल रोजी आरोग्य तपासणी करण्यात आली; तर २ नागरिक व ३ शिक्षक अशा पाच जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. दरम्यान, या प्रकारामुळे कामरगाव येथे मोठी खळबळ माजली आहे.प्राप्त माहितीनुसार, कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील एर्काू शाळेत २ एप्रिल रोजी शालेय पोषण आहाराचे वितरण करण्यात आले. यावेळी संबंधित शिक्षक हजर होते. त्यांना गत आठ दिवसांपासून सर्दी, खोकला, तापेचा त्रास जाणवायला लागला. त्यामुळे अमरावती येथील रुग्णालयात तपासणी केली असता, २५ एप्रिल रोजी त्यांचा ‘कोरोना’ चाचणीचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला. ही वार्ता कामरगाव येथे पसरताच खळबळ उडाली. दरम्यान, कारंजाचे तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी कालीदास तापी, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी किरण जाधव, ठाणेदार सोमनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक कपील मसके, सरपंच सुरेखा देशमुख, उपसरपंच मोसीयौदिन जहिरौदिन, पोलीस पाटील नितीन शिंगाडे आदिंनी तत्काळ गावाला भेट दिली. आरोग्य विभागाच्या चमुकडून संबंधित म्शिक्षकाच्या संपर्कात आलेल्या २०० जणांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांच्यात कोरोनाची कुठलीही लक्षणे आढळली नाहीत; परंतु प्रत्यक्ष संपर्कात आलेले ३ शिक्षक व २ नागरिक अशा पाच जणांना दक्षता म्हणून वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात पुढील १४ दिवसांसाठी दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे कामरगाव येथील ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. (वार्ताहर)

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या