शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : मालेगावच्या बाजारपेठेतील मुख्य रस्ते बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 15:24 IST

न नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता मालेगाव  शहरातील मुख्य बाजार पेठेतील रस्ते बॅरिकेटस्द्वारे २२ एप्रिलपासून बंद करण्यात आले. नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी नगर पंचायत प्रशासनाने हा निर्णय घेतला असून नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे.सध्या जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावरून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर संचारबंदी लागू असली तरी मालेगावात रस्त्यावरून विनाकारण फिरणाºयांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आता नगर पंचायतच्यावतीने मुख्य बाजार पेठेतील रस्ते बॅरिकेटस्द्वारे बंद करण्यात आले. अत्यावश्यक कारणासाठी केवळ मुख्य रस्त्यावरूनच वाहतूक करावी अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा नगर पंचायत प्रशासनाने दिला. त्यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी या रस्त्यावरून नागरिकांना ये-जा करावी लागणार आहे. अत्यावश्यक सेवेशिवाय घराबाहेर पडू नये. विनाकारण कुणी रस्त्यावर फिरताना आढळून आल्यास गुन्हे दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे कायद्याचे पालन करावे, कोणीही घराबाहेर पडू नये , वाहने रस्त्यावर आणु नयेत, असे आवाहन नगर पंचायतने केले.दरम्यान, वारंवार आवाहन करूनही मॉर्निंग वॉकला जाणाºया नागरिकांची संख्या कमी होत नसल्याने शेवटी २३ एप्रिल रोजी पोलीस प्रशासनाने कारवाईची पाऊल उचलले. २३ एप्रिल रोजी ‘मॉर्निंग वॉक’ला जाणाºया १५ जणांवर कलम १८८ अंतर्गत कारवाई केली. त्यामुळे सकाळी, संध्याकाळी कोणीही वॉकिंग करिता बाहेर पडू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले. सर्वच ठिकाणी कारवाई व्हावी !नगर पंचायत मार्फत मास्क न लावणे, सार्वजनिक जागेवर थुंकने, अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त अन्य दुकाने उघडणे या कारणाकरीता कारवाई केल्या जात आहे. मात्र या कारवाया केवळ मुख्य बाजारपेठेत होत आहेत. या कारवाया बँक परिसरात सुद्धा होणे अपेक्षित आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रशासनातर्फे आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनीदेखील मास्क लावून व गर्दी टाळून प्रशासनाला सहकार्य करीत जिल्हा कोरोनामुक्त करणे आवश्यक ठरत आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या