शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

CoronaVirus : ‘होम क्वारंटीन’ नागरिकांचा घराबाहेर वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 10:41 IST

काही जण घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनात येत असल्याने त्यांची रवानगी जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात केली जात आहे.

वाशिम : परराज्य, परजिल्ह्यातून येणाऱ्या मजूर, कामगारांना घरातच १४ दिवस राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गत आठ दिवसात जिल्ह्यात दोन हजार मजूर, कामगार आल्याची नोंद जिल्हा प्रशासनाच्या दप्तरी आहेत. रेड झोनमधून येणाºया कामगार, मजुरांमुळे जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून या सर्वांनी घरातच राहणे आवश्यक आहे. परंतू, काही जण घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनात येत असल्याने त्यांची रवानगी जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात केली जात आहे. गत आठवड्यात जवळपास १० ते १५ जणांची रवानगी झाली आहे.कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनामार्फत लॉकडाउन व संचारबंदी लागू केलेली आहे. लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यात वाशिम जिल्ह्यातील तसेच परराज्यातील मजूर अडकले होते. या मजूरांना आपापल्या गावी जाण्याची मुभा मिळाल्याने ते आपापल्या गावाकडे मिळेल त्या वाहनाने परतत आहेत. गत आठ दिवसात जिल्हयात जवळपास दोन हजार मजूर परतल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. या मजुर, कामगारांना जिल्हा परिषद शाळा, शासकीय इमारती किंवा त्यांच्या घरात व्यवस्था असेल तर तेथे ‘होम क्वारंटीन’ करण्यात आले. १४ दिवस घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या. तथापि, या सुचनांकडे दुर्लक्ष करीत अनेकजण गावात फिरत असल्याचे निदर्शनात येत आहे. कारंजा, रिसोड तालुक्यातील १० ते १५ जण गावात फिरत असल्याचे आढळून आल्याने त्यांची रवानगी जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली. मंगरूळपीर तालुक्यातील कोठारी येथील सहा लोकांना जिल्हा परिषद शाळेत ‘क्वारंटीन’ करण्यात आले; मात्र त्यांच्यातील काहीजण दारू पिऊन गावभर फिरत असून मज्जाव केला असता, सरपंच व पोलिस पाटील यांना शिविगाळ करित असल्याचा गंभीर प्रकार १४ मे रोजी घडला होता.

‘होम क्वारंटीन’चा नियम न पाळल्यास कोरोना संसर्गाचा धोका४१५ मे रोजी परजिल्ह्यातून येणाºया एका महिलेला कोरोनासंसर्ग झाल्याची बाब समोर आली. त्यामुळे परराज्य तसेच परजिल्ह्यातून येणाºया मजूर, कामगारांनी १४ दिवस घरातच राहणे आवश्यक आहे. मात्र, काही जण गावात बिनधास्त फिरत असल्याने कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम