शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

Coronavirus : कोरोनाबधिताच्या संपर्कातील सर्वजण निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 17:30 IST

Coronavirus : कोरोनाबधिताच्या संपर्कातील सर्वजण निगेटिव्ह आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सावंगी (जि.वर्धा) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कवठळ (ता.मंगरूळपीर) येथील एका व्यक्तीच्या ‘थ्रोट स्वॅब’चा अहवाल १० मे रोजी ‘पॉझिटिव्ह’ आल्यानंतर, ‘हाय-रिस्क’ संपर्कात आलेल्या कारंजा येथील एका खासगी डॉक्टरसह पाच तसेच पाचंबा व पोहा येथील 'सारी'चे प्रत्येकी एक रुग्ण असे एकूण ७ व्यक्तींच्या घशातील स्रावाचे नमुने १३ मे रोजी निगेटीव्ह आले होते. कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील सात आणि अन्य दोन असे ९ जणांचे अहवालही १४ मे रोजी दुपारी १२.३० वाजता निगेटिव्ह आल्याने  जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला.मंगरूळपीर तालुक्यातील कवठळ येथील एका मधुमेही रूग्णाला अस्वस्थ वाटल्याने त्याला कारंजा येथील एका खासगी दवाखान्यात चार दिवस भरती केले होते. रुग्ण कारंजा येथून अकोला आणि अकोला येथून वर्धा जिल्ह्यातील सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात ८ मे रोजी उपचारार्थ दाखल झाला. १० मे रोजी त्याच्या ‘थ्रोट स्वॅब’चा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्याने, त्याच्यावर उपचार करणाºया कारंजा येथील त्या खासगी डॉक्टरसह पाच जण तसेच पाचंबा व पोहा येथील 'सारी'चे प्रत्येकी एक रुग्ण असे एकूण सात नमुनेही तपासणीसाठी पाठविले होते. या ११ नमुन्यांचे अहवाल १३ मे रोजी निगेटिव्ह आले.१२ मे रोजी कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील सात जण आणि अन्य ठिकाणचे दोन जण असे एकूण ९ जणांच्या थ्रोट स्वॅबचे नमुने अकोला येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या नऊ जणांचे अहवाल १४ मे रोजी प्राप्त झाले असून, सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळाला.आतापर्यंत ९७ जणांचे थ्रोट स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ९४ अहवाल निगेटिव्ह तर तीन अहवाल पॉझिटिव्ह आहेत. या तीन पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एक रुग्ण बरा झाल्याने त्याला २४ एप्रिल रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर कोरोनाबाधित ट्रक क्लिनरचा मृत्यू झाला. सध्या कोरोनाबाधित असलेल्या ट्रक चालकावर जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. दरम्यान, कवठळ येथील नागरिकांचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असून, सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम